मुंबई– एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडानंतर आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांनी या घटनेबाबतचा संताप आज शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत व्यक्त केला. ठाकरे आणि शिवसेना या नावाशिवाय जगून दाखवा असे आव्हान त्यांनी बंडखोरांना थेट दिले. माझा फोटो वापरु नकाच, पण बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही वापरु नका, असे त्यांनी यावेळी सांगितले. मी मुख्यमंत्रीपदी नको, ही राक्षसी महत्त्वाकांक्षा होती, असेही उद्धव म्हणाले. त्याच वेळी या बंडामागे नेमकं काय कारण होतं, त्याला उल्लेखही त्यांच्याकडून बोलता बोलता झालाच. मुळात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वर्चस्वाच्या वादातून हा सगळा प्रकार घडत असल्याची चर्चा होती. त्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे आला. यामुळे या बंडामागचे मुख्य कारण काय आहे, हे स्पष्ट झाले. काय म्हणाले मुख्यमंत्री?
विठ्ठल आणि बडवे असा आरोप करण्यात येतो आहे. हीच पद्धत ते आदित्य बद्दल करतील. स्वताचा मुलगा खासदार पण माझा मुलगा काही होता कामा नये, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी नेमकी वादाची नेमकी ठिणगी कुठे पडली होती हे सांगितले. मी कुठल्या शिवसैनिकांच्या मुलाची प्रगती रोखली होती का, असा सवाल उद्धव यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या पक्षातील वाढत्या वर्चस्वामुळे एकनाथ शिंदे नाराज होती अशी चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेलया नगरविकास खात्यात आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप वाढत होता अशी तक्रार करण्यात येत होता. तसेच नगरविकास खात्यातील अनेक महत्त्वाकांक्षी योजनांसाठी आदित्य ठाकरे यांचा चेहरा समोर करण्यात येत होता. त्यामुळे शिंदे नाराज होते. सुभाष देसाई यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपला होता. अशा स्थितीत नगरविकास खाते आदित्य ठाकरेंकडे तर उद्योग खाते एकनाथ शिंदेंकडे जाईल अशी चर्चा होती, त्यामुळेच शिंदे नाराज होते. यावरुन उद्धव आणि त्यांच्या बिनसले असल्याची चर्चा आहे.
एकदा कानावर आल्यावर मी त्यांना बोलवून विचारलं होतं. की हे बंडाचं माझ्या कानावर आहे, त्यावर नाही नाही आपण असे कसे वागू, असे उत्तर शिंदेंनी दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी आजच्या संभाषणात सांगितले आहे. त्यावर खोटं असेल आणि खोटं असावं, हेच आपलं म्हणणं असल्याचं उद्धव यांनी सांगितलं होतं. खोटं असेल तर मुद्दा नाही, पण खोटं नसेल तर स्पष्ट सांगा असे उद्धव म्हमाले होते. त्यावर आपण भाजपासोबत जायला हवं, असा काही आमदारांचा आपल्यावर दबाव आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाल्याचे उद्धव यांनी सांगितले. त्यावर ठीक आहे, आपण जनतेसमोर जाऊ, भाजपासोबत परत जायला, मात्र ज्या भाजपाने आपल्यावर आणि मातोश्रीवर आरोप केल्यानंतर, तुमचं रक्त नाही सळसळत का, असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदेंना केला होता, असं उद्धव म्हणाले. यावरुन हा सगळा वाद कुठपर्यंत गेला होता, हे आपल्या लक्षात येईल.