उद्या विधानसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे. त्याआधी अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष नालासोपाराकडे लागलेलं आहे. भाजपचे नेते विनोद तावडे हे नालासोपारामधील विवांत हॉटेलमध्ये बसले होते. त्यावेळी तिथे क्षितीज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचे नेते -कार्यकर्ते पोहोचले. तिथे जात बॅगमधून एक डायरी काढली. त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते हॉटेलच्या खाली आले. जोवर विनोद तावडे खाली येऊन बोलत नाहीत. तोवर मागे हटणार नाही. तावडेंना बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी घेतली. त्यानंतर विनोद तावडे यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या शेजारी बसून पत्रकार परिषद घेतली. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी भर पत्रकार परिषदेत तावडेंना प्रश्न विचारला आहे.
गेले काही दिवस नालासोपाऱ्यात परिवर्तन वगैरे बोलत आहेत. खरंतर तावडे साहेब तुमच्या भाजपच्या नेत्यांचा अपमान करत आहेत. वसई तालुक्त्यातील आमचं प्रतिनिधित्व विष्णू सावरा यांनी केलं. ते पालकमंत्री होते. सावरा आणि खासदार वनगा साहेब आमचं नेतृत्व पर्यंत करत होते. २००९पर्यंत रामभाऊ नाईक यांनी नेतृत्व केलं. ते केंद्रात मंत्री होते, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.
आज भाजपच्या काही मित्रांनी सांगितलं की तावडे साहेब माझे मित्र आहेत. क्षितीज ठाकूर त्यांना काका बोलतो. तावडे साहेब तुम्ही एका सर्व्हेत होता. त्यामुळे नेते आले नाही, असं सांगायला हवं होतं. काशाला आले. डायऱ्या सापडल्या. एकाच रुममध्ये १० लाख रुपये होते. हे पैसे कुणाचे. आता हितेंद्र ठाकूरचे होते म्हणून सांगू नका. असं असेल तर मी घेऊन जातो. मला उपयोगी पडतील कामधंद्याला, असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आचारसंहितेच्या विषयाच्या दिवशी वोटिंग मशीनची माहिती दिली. आचारसंहितेचा भंग नाही. वास्तव आम्ही सांगितलं. हितेंद्र आप्पांनीही सांगितलं. आता निवडणूक आयोग आणि पोलीस काय ते करतील. कार्यकर्त्यांना मतदान कसं करायचं हे सांगण्यासाठी आलो होतो. निवडणूक आयोगाने आरोपांची चौकशी करावी, असं विनोद तावडे म्हणाले आहेत.