Home Isolation | सौम्य लक्षणे असलेल्या ‘कोरोना’ रुग्णांचे आता घरात विलगीकरण शक्य

17 दिवसांनंतर संबंधित रुग्णाला विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. मात्र त्याआधी 10 दिवस रुग्णाला ताप न आल्याची अट आहे. (Home Isolation for mild symptoms Covid Positive Patients)

Home Isolation | सौम्य लक्षणे असलेल्या 'कोरोना' रुग्णांचे आता घरात विलगीकरण शक्य
Follow us
| Updated on: Jun 07, 2020 | 7:51 PM

मुंबई : ‘कोरोना’ची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे आता घरातच विलगीकरण केले जाणार आहे. राज्य सरकारने परिपत्रक जारी करत याविषयी सूचना दिल्या. याला ‘होम आयसोलेशन’ असे संबोधले जाईल. (Home Isolation for mild symptoms Covid Positive Patients)

घरामध्ये सुविधा असल्यास सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांचं घरातच विलगीकरण शक्य होणार आहे. राज्याच्या परिपत्रकात केंद्राच्या सूचनांचा हवाला देण्यात आला आहे.

अतिसौम्य किंवा लक्षणंविरहित रुग्णांना घरीच होम आयसोलेशन करता येणार आहे. डॉक्टरांनी अशा रुग्णांना प्रमाणित करण्याची अट सरकारने घातली आहे. सरकारकडे प्रतिज्ञापत्र देऊनच घरी विलगीकरणाची अनुमती दिली जाणार आहे.

17 दिवसांनंतर संबंधित रुग्णाला विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. मात्र त्याआधी 10 दिवस रुग्णाला ताप न आल्याची अट आहे. गृह विलगीकरण संपल्यानंतर पुन्हा कोविड चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

गृह विलगीकरणाची पात्रता

1. उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाला अतिसौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित केले असावे. 2. संबंधित रुग्णाच्या घरी विलगीकरणासाठी तसेच कुटुंबातील व्यक्तींसाठी अलगीकरणासाठी (होम क्वारंटाईन) योग्य सोयी-सुविधा उपलब्ध असाव्यात. 3. घरी दिवसरात्र (24X7) काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी. संबंधित काळजीवाहू व्यक्ती आणि उपचार देणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दूरध्वनी) उपलब्ध असणे अनिवार्य (Home Isolation for mild symptoms Covid Positive Patients) 4. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काळजीवाहू व्यक्ती आणि सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मात्रा घ्यावी. 5. मोबाईलवर “आरोग्य सेतू” अ‍ॅप डाऊनलोड करावे आणि ते सतत अ‍ॅक्टिव्ह असावे 6. रुग्णांनी स्वत:ची काळजी घेणे आणि नियमितपणे प्रकृतीबाबत पाठपुराव्याविषयी जिल्हा सर्वेक्षण अधिकारी/पथकाला माहिती देणे अनिवार्य

हेही वाचा : कोरोनावर प्रभावी Remdesivir इंजेक्शन राज्य सरकार खरेदी करणार, काय आहे रेमडेसीवीर इंजेक्शन?

राज्यात गेल्या 24 तासात 3007 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. राज्यात दिवसभरात 91 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णसंख्या 85 हजार 975 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 3060 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात 1924 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 39 हजार 314 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

(Home Isolation for mild symptoms Covid Positive Patients)

'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....