Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना प्रवासाची परवानगी कशी मिळणार? गृहमंत्र्यांकडून नियमावली जाहीर

राज्य सरकारने या नागरिकांनाचा आपआपल्या घरी परतण्याचा मार्ग मोकळा केला आहे. स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची माहिती देत नियमावली देखील जाहीर केली आहे (Anil Deshmukh on returning of people amid Lockdown).

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना प्रवासाची परवानगी कशी मिळणार? गृहमंत्र्यांकडून नियमावली जाहीर
Follow us
| Updated on: May 01, 2020 | 9:49 PM

मुंबई : देशभरात लॉकडाऊनची मुदत 3 मेवरुन 17 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, राज्य सरकारने या नागरिकांनाचा आपआपल्या घरी परतण्याचा मार्ग मोकळा केला आहे. स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची माहिती देत नियमावली देखील जाहीर केली आहे (Anil Deshmukh on returning of people amid Lockdown). यासाठी त्यांनी अशा विद्यार्थी, कामगार आणि मजूरांना जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यास सांगितलं आहे. तसेच त्यात कोणते तपशील द्यायचे आहे याची यादीही दिली आहे.

अनिल देशमुख म्हणाले, “लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. राज्यात किंवा परराज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थी, कामगार आणि इतरांना आपआपल्या गावी जाण्यासाठी आपली संपूर्ण माहिती असणारा अर्ज नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावा लागेल.”

जिल्हाधिकाऱ्यांना द्यायच्या अर्जात काय माहिती हवी?

  • पूर्ण नाव
  • मोबाईल क्रमांक
  • पर्यायी मोबाईल क्रमांक
  • जेथील रहिवासी आहात त्या तालुक्याचं नाव
  • ज्या राज्यात अडकला आहात त्या राज्याचं नाव
  • ज्या जिल्ह्यात अडकला त्या जिल्ह्याचं नाव
  • ज्या तालुक्यात अडकला त्या तालुक्याचं नाव
  • जिथे अडकला तेथील पिन कोड
  • संपूर्ण पत्ता
  • आपण एकटे आहात का?
  • आपण कुटुंबासोबत आहात का?
  • आपण गटामध्ये आहात का?
  • तुमच्याकडे स्वतःचे वाहन आहे का?

राजेश टोपे म्हणाले, “मुंबई-पुण्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर निर्णय घेण्यात येईल. एक अॅप तयार करण्यात आलं आहे. त्याद्वारे नागरिक नोंदणी करत आहेत. एखाद्या ठिकाणी खूप गर्दी असेल तर तेथे शासनाच्यावतीने काही नियोजन करुन तेथील नागरिकांना आणता येईल. मात्र जेथे 5 किंवा 10 च्या संख्येत लोक असतील तर त्या लोकांनी तेथूनच काही गाड्या करुन, स्वतःची तपासणी करुन इकडं येण्याची गरज आहे. यात तपासणी करणं फार महत्त्वाचं आहे. बाहेर अडकलेल्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही याची आधी तपासणी होणं अत्यावश्यक आहे.”

संसर्गाची खात्री करुन झाल्यावर त्यांना स्वीकारण्यास अडचण नाही. तसंच ठरलं आहे. कोटा येथे केलं तसं जर काही नियोजन करुन या लोकांना आणता आलं तसं गाड्या पाठवून या लोकांना आणता आलं तर प्रयत्न केले जातील. सार्वजनिक वाहतूक 100 टक्के बंद राहणार म्हणजे राहणार. संपूर्ण देशातील सार्वजनिक वाहतूक बंद राहिल. बस, रेल्वे, विमानसेवा पूर्णपणे बंद राहतील. केवळ अडकलेल्या लोकांसाठी काही वेगळी व्यवस्था करण्याचा विचार केला जाईल, असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

“परराज्यातील लोकांना पाठवण्याची शिस्तबद्ध योजना, गर्दी नको”

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “परराज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात अडकले त्यांना त्यांच्या राज्यात सुखरुपपणे पाठवण्यासाठी शासनामार्फत शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे. संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. राज्या-राज्यांमधील समन्वयातून या सर्व बांधवांना त्यांच्या राज्यात पाठवले जाईल आणि त्याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही महाराष्ट्रात परत आणले जाईल, परंतु त्यासाठी गर्दी करू नका, झुंडीने जमा होऊ नका हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांनाही जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांचीही त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या :

पुण्यात अडकलेल्या नागरिकांना दिलासा, घरी जाण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात

मुंबई-पुण्यात अडकलेल्यांना गावी जाण्याची व्यवस्था होणार का? राजेश टोपे म्हणतात…

Corona Live Update | राज्यात तब्बल 1008 रुग्ण वाढले, बाधितांची संख्या 11 हजार 506 वर

'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना.
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप.
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप.
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण.
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका.