हॉस्पिटलचं बिल आधी ऑडिटरकडे, मग रुग्णांना देणार, राजेश टोपेंची मोठी घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते

हॉस्पिटलचं बिल आधी ऑडिटरकडे, मग रुग्णांना देणार, राजेश टोपेंची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Jul 24, 2020 | 5:58 PM

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह स्थानिक प्रशासनाने बैठक घेऊन, नाशिकमधील सद्यस्थितीवर मंथन केलं. यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. (Sharad Pawar reviewed Nashik corona)

यावेळी शरद पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं सांगितलं. “राज्यातील 3000 हेल्थ ऑफिसर सेवेसाठी उपलब्ध करणार आहोत. सर्व ऑडिटर्सला एक एक हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात येईल. ऑडिटर्सने तपासणी केल्यानंतरच बिल रुग्णांना दिल जाईल”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

हॉस्पिटलचं बिल आधी ऑडिटरकडे, मग रुग्णांना देणार

राज्यातील 3000 हेल्थ ऑफिसर सेवेसाठी उपलब्ध करणार आहोत. खासगी रुग्णालये कोव्हिडची बिलं जास्त आकारतात अशा तक्रारी आहेत. त्याबाबत अत्यंत स्पष्ट सूचना आहेत, जे सरकारी ऑडिटर आहेत, या सर्व ऑडिटर्सला एक एक हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात येईल. जे बिल हॉस्पिटल देईल ते आधी ऑडिटर्सकडे तपासणीसाठी जाईल. ऑडिटरने तपासल्यानंतर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जी रुग्णालये ठरली आहेत, त्यातील उपचार मोफत होत आहेत की नाही, हे सगळं ऑडिटर तपासेल. त्यानंतर ते बिल रुग्ण आणि नातेवाईकांना दिलं जाईल. रिक्त जागांच्या बाबत मेरिटवर जागा भराव्यात आशा सूचना दिल्या आहेत. रिक्त जागांचा प्रश्न आज निकाली निघेल, असं राजेश टोपे म्हणाले.

लॉकडाऊनचा अधिकार पालकमंत्र्यांना

साखळी ब्रेक करण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय आहे. नाशिकमध्ये 15 ते 21 ऑगस्टपर्यंत उपलब्धता भरपूर आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय पालकमंत्र्यांवर सोपावलेला आहे. नाशिकमध्ये लगेच लॉकडाऊनची गरज नाही. रेमडिसिव्हरच्या सगळ्या ऑर्डर 3 कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. कलेक्टरने हे औषध मागवायला अडचण नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

7000 पेक्षा जास्त रुग्ण बरे

यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, “7000 पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन गेले. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे नाशिकमध्ये आहे. डिसीएच सुविधा अद्ययावत करण्याचं काम आहे. कॉलसेंटर तयार करणार. त्यामुळे कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणते बेड उपलब्ध हे कळणार. टेस्टिंग, इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन वाढवलं पाहिजे”

शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

दुसरीकडे शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर इथे रुग्ण संख्या जास्त आहे. एक महिन्यापूर्वीच्या आणि आजच्या परिस्थितीमध्ये फरक आहे. मुख्यमंत्री केवळ या एका कामासाठी पूर्णपणे लक्ष घालून आहेत. मुख्यमंत्री त्यांचे काम करत आहेत. मुंबईतील परिस्थिती तुम्ही पाहिली आहे. लवकरच ते नाशिक दौरा करतील” (Sharad Pawar reviewed Nashik corona)

आम्ही फिल्डवर जाऊन परिस्थिती बघून त्याची माहिती देणार आहोत. बेडची संख्या वाढली पाहिजे आणि टेस्टिंगदेखील वाढवण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील आरोग्य विद्यापीठ नाशिकला आहे. इथे डॉक्टर्सची कमतरता असण्याचं कारण नाही. जिल्हा यंत्रणेला डिझास्टर कायद्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये, असं शरद पवार म्हणाले.

महागडी आणि उपयुक्त 50 इंजेक्शन गरीब रुग्णांना विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य संकटासोबतच आर्थिक संकटही आहे. नाशिक-नागपूरही औद्योगिक केंद्रे, यूपी बिहारमध्ये गेलेले कामगार परत येण्यास उत्सुक, त्यांना परत आणण्याचे प्रयत्न करु, असं शरद पवारांनी सांगितलं.

सध्या कोरोनाचं संकट आहे. या संकटात आम्ही राजकीय विचाराने नाही, महाराष्ट्रातील जनतेचे देणे लागतो म्हणून एकत्र आलो आहोत. देवेंद्र फडणवीस असो किंवा कोणीही, त्यांनीही या कामात लक्ष घालावे अशी अपेक्षा आहे, असं पवार म्हणाले.

आर्थिक संकट

लॉकडाऊनबाबत माझी काहीही भूमिका नाही. आरोग्यप्रमाणे आर्थिक संकट मोठं आहे. मुंबई उद्योगधंद्यात राहिलेली नाही. कामगार कोरोनाच्या भीतीने इतर राज्यात गेला, पण तो आता परत येण्यासाठी उत्सुक आहे. अर्थव्यवस्थेची काळजी घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील जनतेचं देणं लागतो. फडणवीसांनीदेखील या कामात लक्ष घालावे अशी अपेक्षा, असं पवार म्हणाले.

संबंधित बातम्या 

Sharad Pawar | शरद पवारांच्या दौऱ्यांचा धडाका, नाशिकमध्ये ‘कोरोना’ स्थितीचा आढावा घेणार 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.