“ठाकुर” पदवी कशी मिळाली? भाटांनी सांगितला इतिहास, यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘बोंडें यांच्या बोंड अळ्या…’
भाजपच्या ओबीसी जागर मोर्च्यामध्ये बोलताना भाजप खासदार अनिल बोंडे यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली होती. तर माजी आमदार आशिष देशमुख यांनी २०२४ च्या निवडणुकीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा दिला होता. त्याला यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलंय.
अमरावती : 10 ऑक्टोबर 2023 | अमरावतीमध्ये भाजपची ओबीसी जागर यात्रा झाली. या सभेत भाजप नेते आशिष देशमुख आणि खासदार अनिल बोंडे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली होती. तर, तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करतान खासदार अनिल बोंडे यांचा तोल ढासळला होता. यांनी इंग्रजांची चाकरी केली म्हणून त्यांना ठाकुरांची पदवी मिळाली अशी टीका केली होती. त्याला कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी जळजळीत उत्तर दिलंय.
यशोमती ठाकूर यांच्यावर केलेल्या या टीकेनंतर इतिहासातील दाखले देण्यासाठी भाट त्यांच्या घरी दाखल झाले. यशोमती ठाकूर यांना ‘ठाकुर’ ही पदवी कशी मिळाली हे सांगण्यासाठी जे भाट आले होते. सन १७०० मध्ये सव्वा तोळ्याची एक अशा सव्वा लाख सोन्याच्या गिन्या गोर गरिबांना दान केल्या होत्या. त्यासाठीच आमदार यशोमती ठाकुर यांच्या कुटुंबाला “ठाकुर” ही पदवी मिळाली अशी माहिती या भाटांनी दिली.
यशोमती ठाकूर यांच्या घरी आलेल्या या भाटांच्या दाव्यानंतर हा इतिहास दाखवून अनिल बोंडे यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं. अनिल बोंडें यांनी आता मानसिक रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे असा टोला त्यांनी लगावला.
खासदार अनिल बोंडें यांचा वेडेपणा सुरू आहे. अनिल बोंडें सध्या नैराश्यमध्ये आहेत. त्यांनी इतिहास वाचला पाहिजे. बोंडें यांच्या बोंड अळ्या आल्या आहेत का? अशी जळजळीत टीका त्यांनी केली. आमच्या मतदारसंघात येऊन बोलता. मी महिला आहे. महिलांचा मान सन्मान करायचा हे बोंडें यांना कळत नाही का? असा सवालही त्यांनी केला.
पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पाचही राज्यात काँग्रेस सरकार येणार आहे. राज्यात प्रत्येक ठिकाणी टोल सुरू आहे. आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. त्यामुळे खासदार डॉ. अनिल बोंडें यांनी मानसिक रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. अशा शब्दात अनिल बोंडें यांच्यावर जोरदार पलटवार केलंय. तर, कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे 2024 मध्ये दिसेल असे प्रतिउत्तर त्यांनी माजी आमदार आशिष देशमुख यांना दिलेय.