गोंधळ घालून सरकार बदनाम करण्याचं षडयंत्र, गुलाबराव पाटील यांनी सांगितलं कसं?
आधी चौकशी करणार की, नाही. सरळ फाशी लावणार का, असा थेट आरोप त्यांनी केला. आधी चौकशी करा. त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील, असंही ते म्हणाले.
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले जातात. सरकार निष्क्रिय आहे, असेही आरोप केले जातात. यावर बोलताना पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आरोप-प्रत्यारोपाची काही हद्द असते. नागपूरला अधिवेशन घ्या, असं सांगितलं जातं. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी वल्गना केली जाते. प्रत्येक्षात करोडो रुपये अधिवेशनावर खर्च होतात. तिथं कामकाज केलं जात नाही. ही निंदनीय बाब आहे. चर्चेद्वारे सर्व गोष्टी सोडविल्या जाऊ शकतात, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. नुसता गोंधळ घालायचा नि सरकार बदनाम करायचं असं षडयंत्र सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. गायरान जमिनीचा घोटाळा असल्याचा आरोप केला जातो. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, आधी चौकशी करणार की, नाही. सरळ फाशी लावणार का, असा थेट आरोप त्यांनी केला. आधी चौकशी करा. त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील, असंही ते म्हणाले.
सरकारचं काम बंद पाडायचं. लोकांना न्याय मिळाला पाहिजे तो मिळू द्यायचा नाही. ही लोकशाहीमध्ये विधिमंडळाच्या कामकाजाची पद्धत नाही. जनतेची काम होत नसल्याचा आरोप होतो. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, विरोधी पक्ष याला जबाबदार आहे. कुणी टाळ्या वाजवतंय कुणी प्रश्न विचारतंय. सरकार बदनाम करण्याचं छडयंत्र आहे.
एसआयटीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. संत, महंत जे-जे असतील, त्यांना बाहेर काढलं पाहिजे. ४०० कोटी रुपयांचं उत्खनन केलेलं आहे. १५ दिवसांत एनएची आर्डर मिळणं, १५ दिवसांत उत्खनन करणं, या बाबी समोर आल्या. याची चौकशी झाली पाहिजे, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं.