अमितच्या लग्नपत्रिकेत 5 नावं, लग्नासाठी किती जणांना निमंत्रण?
नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्याच्या शेवटच्या पाचव्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी देशातील आणि राज्यातील सध्यस्थितीवर चौफेर टोलेबाजी केली. मोदी-फडणवीस यांच्यासह त्यांनी शिवसेनेवरी घणाघात केला. मात्र त्याचवेळी त्यांनी मुलाच्या लग्नसोहळ्याचीही माहिती दिली. मुलाचं लग्न खूप मोठ्या प्रमाणात साजरं करणार नाही, असं यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं. पाहा- कशी […]
नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्याच्या शेवटच्या पाचव्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी देशातील आणि राज्यातील सध्यस्थितीवर चौफेर टोलेबाजी केली. मोदी-फडणवीस यांच्यासह त्यांनी शिवसेनेवरी घणाघात केला. मात्र त्याचवेळी त्यांनी मुलाच्या लग्नसोहळ्याचीही माहिती दिली. मुलाचं लग्न खूप मोठ्या प्रमाणात साजरं करणार नाही, असं यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं.
पाहा- कशी आहे राज ठाकरेंच्या मुलाची लग्नपत्रिका?
राज ठाकरे म्हणाले, “अमितचं लग्न 27 जानेवारीला आहे, फार मोठ्या प्रमाणात लग्न होणार नाही. लग्नाला कोणाकोणाला बोलवायचं हा प्रश्न आहे. आम्ही महिना-दोन महिन्यापूर्वी सहज म्हणून आकडा काढला, समजा बोलवायचं झालं तर किती, पक्ष म्हणून माझा पक्ष, इतर पक्ष, कार्यकर्ते, सामाजिक संस्था, पत्रकार, हितचिंतक असे पकडले तर सर्वसाधारण हा आकडा साडेपाच ते सहा लाखापर्यंत गेला. त्यामुळे मला ते शक्य नाही. तुमच्या हौसेसाठी म्हणून त्या दाम्पत्याची ससेहोलपट करायची हे मला योग्य वाटत नाही. पक्षातीलही ठराविकच नेत्यांना मी समारंभाला बोलवणार आहे. मध्यंतरी मी पक्षाचाच आकडा काढला, सहज मुंबईचं म्हणून मी बघितलं, मुंबईमधील गटाध्यक्षांची संख्या फक्त पुरुष महिला नाही, त्यांची संख्या 11 हजार होते. आता नुसते 11 हजार येणार नाहीत ना, त्यांचे डागा, तेजा असतीलच ना. त्यामुळे हे सगळं प्रकरण हाताबाहेरचं आहे. त्यामुळे सगळ्यांनाच बोलवू शकत नाही. मी दिलगिरी व्यक्त करतो.
मुलाची लग्नपत्रिका सप्तश्रृंगीच्या चरणी
राज ठाकरेंचा मुलगा अमितचं लग्न 27 जानेवारी 2019 रोजी मुंबईत होणार आहे. लोअर परळ इथल्या सेंट रेजिस इथं हा लग्नसोहळा पार पडेल. अमित आपली मैत्रीण मिताली बोरुडेसोबत लगीनगाठ बांधणार आहे. राज ठाकरे यांनी काल अमितची लग्नपत्रिका नाशिकमधील सप्तश्रृंगी देवीच्या चरणी ठेवली. अमित ठाकरेंच्या लग्नपत्रिकेत 5 नावं आहेत. अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये पार पडला.
VIDEO : अमितचं लग्न 27 जानेवारीला होणार असून फार मोठ्या प्रमाणात लग्न होणार नाही – राज ठाकरे pic.twitter.com/s7RmuLI3T6
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2018
संबंधित बातम्या
राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्नपत्रिकेत केवळ 5 नावं!
मोदींनी स्वत:चा खड्डा खणलाय, आधी फावडं मग कुऱ्हाड मारुन घेतील: राज ठाकरे