संविधानाचा अपमान करणाऱ्याला नेमकी किती वर्षांची शिक्षा होते, काय आहे नियम?

परभणी जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी एका व्यक्तीनं कथित स्वरुपात संविधानाचा अपमान केल्याची बातमी समोर आली आहे. त्यानंतर जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं आहे.

संविधानाचा अपमान करणाऱ्याला नेमकी किती वर्षांची शिक्षा होते, काय आहे नियम?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 5:02 PM

परभणी जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी एका व्यक्तीनं कथित स्वरुपात संविधानाचा अपमान केल्याची बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीनं संविधानाचा अपमान केला त्या व्यक्तीला स्थानिकांकडून मारहाण करण्यात आली, तसेच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर आता परभणी जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक ठिकाणी जमाव रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.आज आपण जाणून घेऊयात की संविधानाचा अपमान करणाऱ्याला किंवा कोणत्याही राष्ट्रीय प्रतिकांचा, चिन्हांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते.

संविधानाचा अपमान झाल्यामुळे परभणी जिल्ह्यात वातावरण चांगलंचं तापलं आहे. जमाव रस्त्यावर उतरला आहे, काही ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको देखील केला. आंदोलक आक्रमक झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात पोलिसांकडून जमाव बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. जमाव बंदीचे आदेश लागू असताना पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमाण्यास मनाई असते. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

संविधानाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय राष्ट्रीय चिन्ह कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येते. या प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा तसेच पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा आहे. तसेच या प्रकरणात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास उपद्रव करणाऱ्यावर भारतीय न्याय संहिता कलम 191 अंतर्गत दंगलीची कारवाई होते, ज्यामध्ये देखील दोन वर्षांची शिक्षा आणि पाच हजारांच्या दंडाची तरतूद आहे.

तसेच आरोपीच्या कोणत्याही कृतीमुळे जर सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं असेल किंवा कायदा स्वसुव्यवस्था धोक्यात आली असेल तर अशा व्यक्तीवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 अंतर्गत कारवाई होते. त्याला पाच वर्षांचा तुरुंवास आणि मोठा आर्थिक दंड होऊ शकतो.

जमाव बंदी म्हणजे काय? 

ज्या ठिकाणी कोणत्याही कारणामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते, कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची भीती असते अशा ठिकाणी पोलिसांकडून जमाव बंदी लावण्यात येते. जमाव बंदी लागू असताना पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असते. आदेशाचं उल्लंघन झाल्यास शिक्षा होऊ शकते.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.