नव्या कोरोनाचा भारताला धोका किती? नव्या कोरोनाची लागण कुणाला होण्याचा शक्यता ? जाणून घ्या…
जगभरात कोरोनाची पुन्हा एकदा धास्ती घेण्यात आली असून ठिकठिकाणी याबाबत बैठका घेतल्या जात असून आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर गेली आहे.
प्रदीप कापसे, पुणे : चीन मध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. नव्या कोरोनाबाबत चीनमधून येणारे व्हिडिओ आणि प्रसारित होणारी माहिती बघता भारतीयांनी त्याचा धसका घेतला आहे. चीनमध्ये नव्या कोरोनाचा व्हेरियंट आढळून आल्याने जगभरात धसका घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यातील नागरिकांनी नव्या कोरोना व्हेरीयंटबाबत घाबरून जाऊ नये असं भोंडवे यांनी म्हंटलं आहे. नव्या कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे चार ते पाच दिवसांत हा आजार बरा होऊ शकतो. नागरिकांनी मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजे. चीनमधून जे व्हीडीओ येतायेत त्याची सत्यता केंद्रीय आरोग्य यंत्रणेनी तपासली पाहिजे. जर रुग्णसंख्या वाढली, मृत्यू वाढले हॉस्पिटलची संख्या कमी पडू लागली तर लॉकडाऊनची गरज लागू शकते अशी शंकाही डॉ. भोंडवे यांनी व्यक्त केली आहे.
लसीकरण झालेल्यांना गंभीर आजार उद्भवणार नाही मात्र लसीकरण न झालेल्या व्यक्तींना याचा धोका आहे.
मात्र, नागरिकांना घाबरून जाऊ नका आय. एम. ए. चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी आवाहन केले आहे.
चीनमधील कोरोनाची स्थिती बघता भारतीय आरोग्य विभागाने तातडीने बैठक घेऊन काही सूचना केल्या आहे, विमानतळावर विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहे.
गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या आहे. लक्षणं आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या सूचना केल्या आहे.
एकूणच संपूर्ण जगभरात कोरोनाची पुन्हा एकदा धास्ती घेण्यात आली असून ठिकठिकाणी याबाबत बैठका घेतल्या जात असून आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर गेली आहे.