Ratan Tata : शांतनू नायडूची रतन टाटांशी भेट कशी झाली ? दोघांमधला समान दुवा कोणता , तुम्हाला माहीत आहे का ?

फक्त भारतातच नव्हे तर जगभरात विख्यात असलेले प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे जगभरातून शोक व्यक्त करण्यात आला. गुरूवारी अनेक मान्यवरांनी , दिगज्जांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

Ratan Tata : शांतनू  नायडूची रतन टाटांशी भेट कशी झाली ? दोघांमधला समान दुवा कोणता ,  तुम्हाला माहीत आहे का ?
रतन टाटा - शांतनू नायडूImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 1:30 PM

फक्त भारतातच नव्हे तर जगभरात विख्यात असलेले प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे जगभरातून शोक व्यक्त करण्यात आला. गुरूवारी अनेक मान्यवरांनी , दिगज्जांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. शासकीय इतमामात दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले . या संपूर्ण वेळी एक चेहरा सतत त्यांच्याजवळ दिसत होता, तो म्हणजे टाटा समूहात कार्यरत असलेला आणि रतन टाटा यांचा जिवलग, सहकारी शांतनू नायडू. अवघ्या 30 वर्षांचा असलेला शांतनू हा गेल्या कित्येक वर्षांपासून रतन टाटा यांच्यासोबत काम करत होता. रतन टाटा यांच्या निधनानंतर शंतनून एक खास पोस्ट शेअर केली होती. ‘ रतन टाटा यांच्या जाण्याने या मैत्रीत आता पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य घालवीन. प्रेमाची किंमत दु:ख ही आहे. माझ्या लाईटहाऊसला अलविदा’ अशी पोस्ट शेअर करत शांतनूने टाटा यांना अखेरचा निरोप दिला.

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात टाटा ग्रुपचं नाव एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणारे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे वयाच्या 86 व्या वर्षीही कार्यरत होते. या वयातही ते त्यांची सर्व कामं स्वत:ची स्वत: करत असतं. ‘टाटा ग्रुप’ला मोठ्या उंचीवर नेणाऱ्या रतन टाटा यांनी लग्नही केले नाही. गेल्या काही वर्षांपासून रतन टाटा यांच्यासोबत एक तरूण मुलगा सतत दिसत होता. तोच हा शांतनू नायडू. मूळचा पुणेकर असलेल्या शंतनूची रतन टाटा यांच्याशी भेट कशी झाली, तो त्यांच्यासोबत कधीपासून काम करू लागला, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. त्याच्याबद्दल जाणून घेऊया.

कोण आहे शांतनू नायडू ?

गेल्या काही काळापासून रतन टाटा यांच्यासोबत सतत सावलीसारखा दिसणारा शांतनू नायडू टाटा यांच्यासोबत काम करत होता. गेल्या वर्षी रतन टाटा यांनी त्यांचा वाढदिवसही शंतनु याच्यासोबत साजरा केला. शांतनु सतत सावलीसारखा त्यांच्यासोबत असायचा. टाटा समूहासोबत काम करणारा शांतनू हा रतन टाटांच्या व्यवसायासोबतच त्यांची गुंतवणूक पहायचं काम करत होता.

मूळचा पु्ण्याचा असलेल्या शांतनूचा जन्म 1993 साली झाला तो इंजिनिअर, बिझनेसमन, लेखक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही आहे. त्याने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले. 2018 साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो भारतात परत आल्यानंतर तो Tata Trusts च्या चेअरमनच्या ऑफीसमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम करू लागला.टाटा ग्रुपमध्ये काम करणारी त्याची ही पाचवी पिढी,  यापूर्वी त्याच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी टाटा ग्रुपमध्ये काम केलंय.

रतन टाटांशी ओळख कशी झाली ?

शांतनूचं प्राण्यांवर खूप प्रेम आहे. एकदा तो आपल्या एनजीओच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांसाठी काम करत होता. काही वर्षांपूर्वी त्याने रस्त्यावरील बेवारस कुत्र्याला अपघातापासून वाचवण्यासाठी त्यांच्या गळ्यात चमकणारा पट्टा घालण्याचे कॅम्पेन चालवले होते. भटक्या कुत्र्यांसाठी त्याने केलेल्या कामामुळे रतन टाटा खूप प्रभावित झाले आणि त्यांनी शांतनूला आपला असिस्टंट बनण्याची ऑफर दिली. रतन टाटा यांचंही कुत्र्यांवर खूप प्रेम होतं. 2018 सालापासून तो रतन टाटा यांच्यासोबत काम करत होता.

शांतनू याची गुडफेलोज नावाची कंपनीदेखील आहे. तो या कंपनीचा संस्थापक आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळवून देण्याच काम ही कंपनी करते. या कंपनीचे मूल्य पाच कोटीपेक्षा जास्त आहे. यामध्ये रतन टाटा यांनीही गुंतवणूक केली होती.

शांतनूची सॅलरी किती ?

शांतनू याचा महिन्याचा पगार लाखोंमध्ये आहे आणि त्याच नेटवर्थ तर कोट्यवधींमध्ये आहे. त्याला महिन्याला जवळपास 7 लाख रुपये पगार मिळतो. सध्या त्याचे नेटवर्थ 6 कोटींच्या आसपास आहे.

पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी; हवाई दलाच्या विमानांची भरारी
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी; हवाई दलाच्या विमानांची भरारी.
'...पण माझं वय कसं कॉपी करणार?', रोहित पवारांचा कोणाला टोला?
'...पण माझं वय कसं कॉपी करणार?', रोहित पवारांचा कोणाला टोला?.
पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे
पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे.
निवडणुकीआधीच सरकारचा मास्टरस्ट्रोक, कॅबिनेटमध्ये ८० निर्णयांचा धडाका
निवडणुकीआधीच सरकारचा मास्टरस्ट्रोक, कॅबिनेटमध्ये ८० निर्णयांचा धडाका.
अनमोल 'रत्न' हरपला... सामान्य लोकं हळहळतील असा शेवटचा उद्योगपती गेला
अनमोल 'रत्न' हरपला... सामान्य लोकं हळहळतील असा शेवटचा उद्योगपती गेला.
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा.
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन.
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी.