Cyclone Nisarga | चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे 15 मंत्र
कोकण किनारपट्टीवर निसर्ग वादळ घोंघावण्याची चिन्हं आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. (How to keep yourself safe during Cyclone Nisarga)
मुंबई : महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईपासून 600 किलोमीटरपर्यंत याचा प्रभाव होईल. याचा मोठा फटका पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, हरिहरेश्वर या ठिकाणी बसण्याचा अंदाज आहे. कोकणात जोरदार पाऊसही होईल, असा इशारा देण्यात आला आहे. (Safety Tips during Cyclone Nisarga)
संपूर्ण राज्यात 4 जूनपर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीवर हे वादळ घोंघावण्याची चिन्हं आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.
चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे 15 मंत्र
1. प्रथमोपचार पेटी तयार ठेवा, औषध गोळ्या असू द्या 2. पाणी उकळूनच प्या, थंड पाणी टाळा 3. सगळी इलेक्ट्रीक उपकरणं बंद करा, गॅसही बंद ठेवा 4. दारं, खिडक्या बंद ठेवा 5. घराचं काम पूर्ण करा, टोकदार गोष्टी बांधून ठेवा 6. तुमची महत्वाची कागदपत्रं वॉटरप्रुफ करून ठेवा 7. मोबाईल चार्ज करुन ठेवा, एसएमएसचा वापर करा 8. जर तुमचं घर असुरक्षित असेल तर सुरक्षित ठिकाण गाठा 9. मोडकळीस आलेल्या इमारती किंवा घरात जाऊ नका 10. विद्युत तार, खांब यापासून दूर राहा 11. समुद्रात किंवा किनारी जाऊ नका 12. जनावरं, प्राण्यांना बांधून न ठेवता मोकळं सोडा 13. माहितीसाठी न्यूज चॅनल, रेडिओ ऐकत राहा 14. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका 15. फक्त प्रशासनाच्या सूचना वेळेच्या वेळेला लक्षात असू द्या
(Safety Tips during Cyclone Nisarga)
✅ Pack essentials like medicines, baby food; store extra drinking water to last a few days ✅ Listen to @airnewsalerts, monitor warnings ✅ Switch off electrical mains ✅ Keep torches/emergency lights ✅ Board up glass windows, put storm shutters in place pic.twitter.com/QYeypnA5yC
— PIB in Maharashtra ?? #MaskYourself ? (@PIBMumbai) June 2, 2020
निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेली तयारी: pic.twitter.com/nsZAFkwQPm
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 2, 2020
पहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
चक्रीवादळाचा संभाव्य धोका, मुंबईकरांसाठी महापालिकेच्या महत्त्वाच्या सूचना
रायगडमध्ये 3 जूनला जनता कर्फ्यू, आपत्ती व्यवस्थापनासह नॉन कोव्हिड रुग्णालयही उपलब्ध
(Safety Tips during Cyclone Nisarga)