औरंगाबाद-जळगाव महामार्गावर बसला भीषण आग; बस जळून खाक; जीवितहानी नाही
या बसच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, बसमधील सर्व प्रवाशी सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे. आग कशामुळे लागली याची चौकशी केली जाणार आहे.
औरंगाबाद: औरंगाबाद-जळगाव महामार्गावर (Aurangabad-Jalgaon Highway) आज दुपारी एसटी बसला भीषण आग (Bus Burned) लागल्यामुळे या आगीत बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बस जळून खाक झाली असून बसला आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास करण्यात येणार असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. औरंगाबाद-जळगाव महामार्गावरुन ही बस जात असताना बसमध्ये अचानक धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले.
रणरणत्या उन्हातच बसमधून धूर येत असल्याने चालक आणि वाहकांनी प्रसंगावधन राखून बसमधील सर्व प्रवाशांना (Passenger) अगोदर खाली उतरवण्यात आले. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बस जळून खाक
महामार्गावर दुपारच्या वेळी बस जातानाच बसमधून अचानक धूर येऊ लागल्यानंतर बस थांबवून सगळ्या प्रवाशांना खाली उतरवण्यात तोपर्यंत बसमधील ड्रायव्हर केबिनला आग लागली होती, दुपार असल्याने बसने तात्काळ पेट घेतला, त्या आगीत बस जळून खाक झाली. त्यामध्ये पूर्ण बस जळून खाक झाली आहे.
अन् प्रवाशांना खाली उतरवले
बसमधून धूर येऊ लागल्यानंतर बस तात्काळ थांबवण्यात आली. बस थांबवून सर्वात आधी बसमधील प्रवाशी खाली उतरवण्यात आले. बसमधून प्रवाशी खाली उतरत असताना बसने पेट घेतला, त्याआधीच बसमधील सर्व प्रवाशी खाली उतरल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत अगोदर बसमधील ड्रायव्हरची केबिनने पेट घेतला होता.
जीवितहानी नाही
चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधनामुळे बसने पेट घेतल्यानंतरही कोणतीही जीवितहीनी झाली नाही. त्यानंतर प्रवाशांची सोय करुन बसमधील प्रवाशांना पाठवण्यात आले.
संबंधित बातम्या
Bihar Murder : बिहारमध्ये डबल मर्डर, पती-पत्नीच्या संशयास्पद हत्येने खळबळ
UP Murder : उत्तर प्रदेशात संपत्तीच्या वादातून मुलाकडून पित्याची हत्या, आरोपी फरार