“कोरोनासारखे नियम नाही, पण केंद्राकडून सूचना आल्यास…” HMVP व्हायरसबद्दल राज्य सरकार काय म्हणाले?
"सध्या भारतात परिस्थिती नियंत्रणात आहे. भारतात श्वसन संसर्गाची आकडेवारी वाढलेली नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही", असे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.
सध्या देशभरात ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही (HMVP) मुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या विषाणूचे भारतात ६ रुग्ण आढळले आहेत. यात कर्नाटक 2, गुजरात 1, पश्चिम बंगाल 1 आणि तामिळनाडू 2 असे रुग्ण आढळले आहेत. आता एचएमपीव्ही (HMVP) बद्दल राज्य सरकारने एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत एचएमपीव्ही (HMVP) व्हायरसबद्दल चर्चा करण्यात आली. यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे आवाहन केले.
सध्या चीनमध्ये HMPV (ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस) संसर्गाबाबत माहिती सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र, नागरिकांनी घाबरू नये, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. एचएमपीव्ही (HMVP) आजाराला घाबरू नका, असे आवाहन राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. HMPV नवीन विषाणू नाही. HMPV हा 2001 पासून प्रचलित असून, इतर श्वसन संसर्गांप्रमाणे सौम्य लक्षणांसाठी जबाबदार आहे. यात सर्दी, खोकला, ताप यासारखी सामान्य लक्षणे असतात. यात लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना जास्त धोका संभवतो. सध्या भारतात परिस्थिती नियंत्रणात आहे. भारतात श्वसन संसर्गाची आकडेवारी वाढलेली नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.
आरोग्य विभागाचे निर्देश
1. खोकला किंवा शिंका येताना तोंड व नाक झाकावे.
2. वारंवार हात धुणे आवश्यक.
3. ताप, खोकला असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
4. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.
त्यासोबतच सफाई आणि स्वच्छतेचे पालन करावे. सर्व नागरिकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम पाळण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“हा व्हायरस घाबरण्यासारखा नाही”
“आज बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत योग्य ती माहिती देण्यास सांगितले. हा व्हायरस घाबरण्यासारखा नाही. बंगळूरु आणि नागपूरमध्ये जे रुग्ण आढळले, ते चीनला गेले नव्हते. हा आधीचाच व्हायरस आहे. फक्त याबद्दल योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. यात कोव्हिड प्रमाणे नियम नाहीत. मात्र केंद्र सरकारकडून जी नियमावली येईल, ती पाळू”, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
“कोरोनामध्ये भीतीमुळे खूप लोकांनी जीव गमावले. या व्हायरसमध्ये लहान मुलांची काळजी घेण्याची आवश्यक आहे. राज्य शासनाच्या आदेशनुसार आमची टीम कार्यरत आहे. हे विषाणू अनेक वर्षापासून जगात आहे. HMPV मुळे जो आजार होतो, तो सौम्य आहे. एकमेकांपासून हा आजार पसरतो. या व्हायरस रिसर्चमध्ये श्वसन आजाराची तपासणी होते. यावेळी काळजी घेण्याची आवश्यता नाही. खोकला असेल तर रुमाल वापरावा”, असेही आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
स्वच्छता पळा आणि स्वस्थ राहा
“येत्या सोमवारी 6 तारखेला केंद्रासोबत चर्चा झाली. हा आजार आता सौम्य स्वरुपाचा आहे. पण जर हा तीव्र असेल तर त्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. मंत्रिमंडळामध्ये या विषयी चर्चा झाली. शासनकडून आदेश आल्याशिवाय काही काही करु शकत नाही. माञ अलर्ट म्हणून सज्ज आहोत. मंत्रिमंडळमध्ये माहिती दिलेले आहे. स्वच्छता पळा आणि स्वस्थ राहा. सौम्य आजार आहे, चीनमध्ये झाला. पण आम्ही त्याची काळजी घेत आहोत”, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले.