पुलाचा कठडा तोडून कार थेट नदीत कोसळली, पती-पत्नी ठार, तर खाजगी बसच्या अपघातात वऱ्हाडी जखमी

राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या चार निरनिराळ्या अपघातात चार जण ठार झाले आहेत, तर पन्नास हून अधिक गंभीर ते किरकोळ जखमी झाले आहेत.

पुलाचा कठडा तोडून कार थेट नदीत कोसळली, पती-पत्नी ठार, तर खाजगी बसच्या अपघातात वऱ्हाडी जखमी
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 2:40 PM

रायगड – महाडकडून मुंबईकडे येत असताना मुंबई – गोवा मार्गावरील वावे दिवाळी गावाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावर नदीच्या पात्रात कोसळल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. मुंबई – गोवा मार्गावरील इंदापूर वावे दिवाळी गावाजवळ काल सायंकाली उशीरा हा अपघात घडला आहे. या अपघाता पती-पत्नीचा जागी मृत्यू झाला असून क्रेनच्या सहाय्याने नदीतून कार बाहेर काढण्यात आली आहे. राज्यात सोमवार पासून घडलेले विविध चार अपघातात चार जण ठार तर पन्नासहून अधिक जण जखमी झालेले आहेत.

मोटर सायकलीच्या धडकेत दोन ठार

गोंदिया तालुक्यातील रावणवाडी – अर्जुनी दरम्यान रस्त्यावर दोन मोटार सायकलीच्या जोरदार धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मोटरसायकलीवर एकूण पाच प्रवासी प्रवास करीत होते. दोघांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलेले आहे.

बस कलंडून वऱ्हाड जखमी

लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणाऱ्या खासगी बसचा अपघात होऊन नवरदेवासह 40 ते 45 वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना नाशिक येथील मनमाड – मालेगाव महामार्गावरील चोंडी गावाजवळ सोमवारी रात्री घडली आहे. संगमनेरकडून – राजस्थानला ही बस निघाली असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस कलंडली . त्यात नवर देवासह 45 जण किरकोळ जखमी झाले आहेत.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चोंडी गावाच्या ग्रामस्थांनी मदतकार्य राबवून जखमी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

हे सुद्धा वाचा

कंटेनरच्या धडकेने पन्नास फूटी हायमास्ट कोसळला

एका भरधाव कंटेनरने हायमास्ट दिव्याला जोरदार धडक दिल्याने पन्नास फूटाचा हा हायमास्ट दिव्याचा खांब कोसळल्याची घटना बदलापुरातील घोरपडे चौकात कल्याण-कर्जत मुख्य रस्त्यावर सोमवारी पहाटे घडली. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने कोणी जखमी झालेले नाही. चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून या अपघाताची तीव्रता जाणवत आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.