राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपात जातोय, शिवेंद्रराजेंचं रोखठोक स्पष्टीकरण
शिवेंद्रराजेंनी मंगळवारी दुपारी आमदारकीचा राजीनामा दिलाय. बुधवारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील. भाजपात जाण्यामागचं कारण सांगत, राष्ट्रवादीची सत्ता येण्याची कोणतीही शक्यता नाही, असंही ते म्हणाले.
सातारा : मतदारसंघाचा विकास आणि माझे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मी भाजपात जातोय, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवेंद्रराजे भोसले (shivendra raje bhonsle) यांनी दिली. शिवेंद्रराजेंनी मंगळवारी दुपारी आमदारकीचा राजीनामा दिलाय. बुधवारी ते (shivendra raje bhonsle) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील. भाजपात जाण्यामागचं कारण सांगत, राष्ट्रवादीची सत्ता येण्याची कोणतीही शक्यता नाही, असंही ते म्हणाले.
राजीनामा देऊन साताऱ्यात गेल्यानंतर शिवेंद्रराजेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, माझं अस्तित्व टिकवणं मला गरजेचे होतं. उद्या मी पडलो असतो तर माझी राजकीय कारकीर्द संपली असती. लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येईल अशी परिस्थिती राहिलेली नाही. भविष्यात भाजपचीच सत्ता येणार आहे, असा विश्वास शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केला.
… म्हणून शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाची थाप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं शिवेंद्रराजेंनी सांगितलं. मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. माझा कोणावरही आरोप, रोष नाही. शरद पवार साहेबांचं नेतृत्व माझ्यासाठी आदरणीय आहे. कोणतंही पद मिळावं या हेतूने मी भाजपमध्ये प्रवेश करत नाही, असंही ते म्हणाले.
शरद पवार बाजूला बसलेले, आमदार फोडाफोडीवर मुख्यमंत्री म्हणतात….
गेल्या पाच वर्षात मी विरोधी पक्षात असल्यामुळे माझ्या मतदारसंघातील प्रश्नांना न्याय मिळाला नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचं सरकार येईल अशी परिस्थिती राहिलेली नाही ही वस्तूस्थिती आहे. अजून पाच वर्ष विरोधात राहून माझ्या मतदारसंघाचं नुकसान करायचं हे मला लोकप्रतिनिधी म्हणून पटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
शरद पवार साहेबांकडे माझ्या मतदारसंघात जे काही धोके जाणवत होते ते मी मांडले. भविष्यात माझे राजकीय अस्तित्व संपणार असेल तर मला कोणताच पक्ष विचारणार नाही. शेवटी राजकारणात ज्याची ताकत जास्त आहे, त्याला महत्व आहे, असं सांगत भाजपात जाणार असल्याचं शिवेंद्रराजेंनी जाहीर केलं.
चार आमदार भाजपात जाणार
जावळीचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सर्वात आधी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास राजीनामा दिला. त्यानंतर अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड, मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर हे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राजीनामा देण्यासाठी विधान भवनात आले.
याशिवाय नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक हे सुद्धा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या गाडीने विधानभवन येथे दाखल झाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमधून इनकमिंग-आऊट गोईंग होत आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेनेत इनकमिंग होत आहे, तर विरोधातील काँग्रेस-राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग होत आहे.
संबंधित बातम्या :