मी फकीर माणूस, धनंजय मुंडेंचं नाव घ्यायला कशाचीही भीती नाही : चंद्रकांत पाटील
पूजा चव्हाण हिचा लॅपटॉप कुठे आहे? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

सांगली : पूजा चव्हाण हिचा लॅपटॉप कुठे आहे? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. काल (13 फेब्रुवारी) ते म्हणाले होते की, पोलिसांनी पूजा चव्हाण (Pooja Chavan) हिचा लॅपटॉप ताब्यात घेऊन त्याची तपासणी करावी. त्यामधून याप्रकरणाचे बरेच धागेदोरे हाती लागतील. आज त्यांनी तोच मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत पूजा चव्हाण हिच्या लॅपटॉपचा तपास का होत नाही? असा सवाल उपस्थित केला. (I am not afraid take name of Dhananjay Munde : Chandrakant Patil)
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. तसेच रेणू शर्मा-करुणा शर्मा प्रकरणावरुनही सरकारवर आरोप केले. यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी त्यांनी मंत्री संजय राठोड यांचं एकदाही नाव घेतलं नाही. त्यावरुन पत्रकारांनी पाटील यांना प्रश्न विचारला की, ते अद्याप कोणत्याही नेत्याचं नाव का घेत नाहीत? त्यावर पाटील म्हणाले की, त्या संबंधित व्यक्तीचं नाव अजून पोलीस रेकॉर्डवर नाही, किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे आम्ही तसा उल्लेख टाळतोय. परंतु रेणू शर्मा किंवा करुणा शर्मा प्रकरणात आम्ही धनंजय मुंडेंचं नाव घेणारच
चंद्रकांत पाटील म्हणाले की, रेणू शर्माने केलेले अनेक आरोप धनंजय मुंडे यांनी मान्य केले आहेत. त्यानंतर रेणू शर्मा यांनी त्यांची तक्रार मागे घेतली. तर दुसऱ्या बाजूला करुणा शर्मा प्रकरणातही धनंजय मुंडेंचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे आम्ही धनंजय मुंडे यांचं नाव घेणारच. त्यांचं नाव घ्यायला आम्ही कोणालाही घाबरत नाही. मी तर फकीर माणूस आहे. मी धनंजय मुंडे यांचं नाव आत्ता घेतोय, आधी घेतलं होतं आणि पुढेदेखील घेणारच.
पाटील म्हणाले की, मला फक्त एकच प्रश्न पडला आहे. की रेणू शर्मा प्रकरण असेल किंवा करुणा शर्मा प्रकरण असेल, त्यामध्ये धनंजय मुंडेंचं नाव समोर आलं आहे. तसेच रेणू शर्मा प्रकरणात धनंजय मुंडे यांनी अनेक आरोप मान्य केला आहे. तरीदेखील छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हे सगळ कसं काय स्वीकारतो.
लॅपटॉप, मोबाईल कुठे आहे?
पूजा चव्हाण प्रकरणी पाटील यांनी अनेक सवाल उपस्थित केले. मोबाईलमधील संवाद कुणाचे आहेत. ज्यांचं नाव या प्रकरणात येत आहे ते सध्या कुठे आहेत? पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप कुठे आहे? शवविच्छेदन अहवाल दोन कसे आले? आदी प्रश्नांचा भडिमार त्यांनी केला.
पूजाची बदनामी केली जात आहे
समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे प्रकरणात रेणू शर्मावर जसे आरोप करण्यात आले तशाच प्रकारे आता पूजाची बदनामी करण्यात येत आहे. पूजा दारू पित होती, तिचे इतरांशी संबंध होते, अशी तिची बदनामी सुरू झाली असून हे अत्यंत चुकीचं आहे, असंही ते म्हणाले.
तेव्हा मंत्र्याचा राजीनामा मागेल
या प्रकरणात तुम्ही वनमंत्री संजय राठोड यांचं थेट नाव का घेत नाही? मुंडे प्रकरणातही तुम्ही त्यांचं नाव घेतलं नव्हतं, असं पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावेळी मुंडे प्रकरणात मी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं होतं. मुंडेंनी त्या प्रकरणाची कबुली दिली होती. त्यामुळे त्यांचं नाव घेतलं. मी कुणाला घाबरत नाही. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. काय होणार आहे, असं सांगतानाच पूजाच्या प्रकरणात ऑडिओ क्लिपचा तपास सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित व्यक्तीचं नाव रेकॉर्डवर घेतल नाही. मग मी तरी त्यांचं नाव का घेऊ? असा सवालही त्यांनी केला. ज्या क्षणी संबंधित मंत्र्याचं नाव रेकॉर्डवर येईल, त्याच क्षणी त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.
पोलिसांनी अजूनही पूजा चव्हाणचा लॅपटॉप चेक केलेला नाही : पाटील
शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, राज्य सरकारने पूजा चव्हाण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करु नये, असे म्हटले. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी लक्ष घालावे. त्यांनीच पूजा चव्हाणला न्याय मिळवून द्यावा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. आतापर्यंत या प्रकरणातील ज्या ऑडिओ क्लीप्स समोर आल्या आहेत त्याआधारे पोलिसांनी सखोल चौकशी करावी. पोलिसांनी अजूनही पूजा चव्हाणचा लॅपटॉप चेक केलेला नाही. त्याची तपासणी केल्यास बरीच माहिती समोर येईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
माढ्यातून लढण्याचा निर्णय मागे घेणाऱ्यांनी मला शिकवू नये, चंदक्रांत पाटलांचा पवारांना टोलाhttps://t.co/q0xlvzAeJy@PawarSpeaks | #ncp | @NCPspeaks | @ChDadaPatil | #SharadPawar
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 14, 2021
संबंधित बातम्या:
पूजाच्या आत्महत्येची CID सारख्या संस्थेकडून चौकशी करा, आजोबांची मागणी
मोर्चा निघाला पण माणसं कुठाय?; संजय राठोडांच्या होमपीचवरच मोर्चा रद्द करण्याची नामुष्की
(I am not afraid take name of Dhananjay Munde : Chandrakant Patil)