Sharad Pawar on UPA chairperson: यूपीएच्या अध्यक्षपदात कोणताही रस नाही, शरद पवार यांचं मोठं विधान; पण आघाडीसाठी…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूपीएचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. शिवसेनेकडूनही ही मागणी सातत्याने होत असते. राष्ट्रवादीच्या युवक आघाडीने तर पवारांना यूपीएचे अध्यक्ष करण्याचा ठरावही केला.

Sharad Pawar on UPA chairperson: यूपीएच्या अध्यक्षपदात कोणताही रस नाही, शरद पवार यांचं मोठं विधान; पण आघाडीसाठी...
Sharad Pawar on UPA chairperson: यूपीएच्या अध्यक्षपदात कोणताही रस नाही, शरद पवार यांचं मोठं विधान; पण आघाडीसाठी...Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 9:56 AM

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी यूपीएचे (UPA)अध्यक्ष व्हावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. शिवसेनेकडूनही (shivsena) ही मागणी सातत्याने होत असते. राष्ट्रवादीच्या युवक आघाडीने तर पवारांना यूपीएचे अध्यक्ष करण्याचा ठरावही केला. परंतु, या विषयावर शरद पवार यांनी आज पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. मला यूपीएच्या अध्यक्षपदात काहीच रस नाही, असं विधानच शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे यूपीएचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आणि पर्यायाने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडेच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे. पवार यांनी यूपीएच्या अध्यक्षपदात रस नसल्याचं सांगितलं असलं तरी देशातील सर्व विरोधकांची एकजूट करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर येथे आले असता पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारताना पवारांनी ही खुलासा केला आहे.

मला काही यूपीएचं नेतृत्व नको आहे. आमच्या तरुणांनी ठराव केला. यूपीएच्या अध्यक्षपदासाठीचा. मला त्यात यत्किंचित रस नाही. मी त्यात पडणार नाही. ही जबाबदारी मी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देण्याचा कुणी प्रयत्न करणार असेल तर त्यांना सहकार्य शक्ती आणि पाठिंबा आणि मदत या सर्व गोष्टीला माझी तयारी आहे. त्या गोष्टी आम्ही करत असतो, असं शरद पवार म्हणाले.

काँग्रेस पक्ष सोबत हवाच

विरोधी पक्षाने एकत्र यावं असं म्हटलं जातं. पण त्यातील वास्तव गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाही. ममता बॅनर्जी यांचा पक्ष बंगालमध्ये शक्तीशाली आहे. त्या सत्तेत आहेत. त्यांना लोकांचा पाठिंबा आहे. बाकीच्या पक्षांची राज्या राज्यात शक्तिकेंद्र आहेत. काँग्रेस सत्तेत नसेल पण देशात सर्व ठिकाणी काँग्रेस कमी जास्त प्रमाणात आहे. प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आहे. गावात आहे. जो पक्ष व्यापक आहे. त्या पक्षाला घेऊन पर्यायी काही करायचं असेल तर ते वास्तवाला धरून होईल. आमचे मित्रं पक्ष काही करत असेल तर त्यातून चांगलं निर्माण होईल, असं ते म्हणाले.

असे पुतीन होऊ नये

देशात शक्तीशाली विरोधी पक्ष असावा, संसदीय लोकशाहीत असायला हवा. एकच विरोधी पक्ष हवा असेल तर मग ते पुतीन सारखं होईल. रशियाने ठराव केला. चीनने केला. असे पुतीन होऊ नये ही अपेक्षा आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

एकत्र बसून राष्ट्रपतीपदाबाबतचं धोरण ठरवू

यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची व्यवस्था केली आहे. ममता बॅनर्जी यांची इच्छा आहे की, सर्वांनी एकत्र बसून विचार करावां. उद्धव ठाकरे आणि मी बैठक बोलवावी. ती बैठक मुंबईत व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. आम्ही इतरांशी बोललो नाही. ममतादीदींनी चांगल्या सद्भभावनेतून भूमिका मांडली आहे. अशी बैठक घ्यायची असेल तर सर्वांना विश्वासात घ्यावे लागेल. आंध्रप्रदेश, तेलंगना, राजस्थान, तामिळनाडू येथील मुख्यमंत्री आदी सर्वांशी चर्चा करून एकत्र बसून निर्णय घेऊ. राष्ट्रपतीपदाबाबतचं धोरण ठरवू, असं पवार म्हणाले.

संबंधित बातम्या:

Sharad Pawar on Raj Thackeray: त्यांच्या तोंडाला कुणीही मर्यादा घालू शकत नाही, शरद पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Raj Thackeray दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात, यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही – जितेंद्र आव्हाड

sanjay raut on happiness index: निवडणुका जिंकल्या, पण देश ‘आनंदी’ नाही, संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.