अमृता फडणवीस म्हणतात, मला ब्राह्मण असल्याचा गर्व आहे, पण मार्केटिंग बाबत केलं मोठं विधान !

शुक्ल यजुर्वेद संस्थेची इमारत उभी करण्यासाठी कोण मध्ये येतो ते मी बघते. जे अधिकारी हे काम थांबवत आहेत त्यांची नावे मला कळवा मी पुढे बघते, असा दमच अमृता फडणवीस यांनी भरला आहे.

अमृता फडणवीस म्हणतात, मला ब्राह्मण असल्याचा गर्व आहे, पण मार्केटिंग बाबत केलं मोठं विधान !
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 1:06 PM

नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोमवारी नाशिकच्या दौऱ्यावर होत्या, बालदिनाच्या निमित्ताने त्यांनी नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या आहे. त्याच दरम्यान ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी एक भुवया उंचवणारं विधान केले आहे. नाशिकमध्ये ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात बोलत असतांना, ब्राह्मण महासंघ जात- धर्म, पंथ बाजूला ठेऊन अनेकांसाठी झटतो. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या इच्छा-आकांक्षा समजून घेतो. ब्राह्मण असल्याचा गर्व आहे, परंतु आम्हाला आमची मार्केटिंग करता येत नाही असं विधान अमृता फडणवीस यांनी नाशिकमध्ये केले आहे. अमृता फडवणीस यांचे विधान नेहमीच स्पष्ट असल्याने अनेकदा त्या ट्रोलही होतात. इतकंच काय तर त्यांचे पती राजकारणात असल्याने त्यांच्या विधानावर आरोप प्रत्यारोप देखील होत असतात. नाशिकमध्ये केलेल हे विधान चर्चेचा विषय ठरत आहे.

नाशिकच्या पंचवटीत येथील ब्राह्मण समाजाच्या इमारतीचे बांधकाम रखडले असल्याने त्याची जबाबदारी त्यांनी डॉ. भारती पवार यांच्यासह स्थानिक आमदार यांच्यावर सोपवत काम पूर्ण करा असं म्हंटलं आहे.

शुक्ल यजुर्वेद संस्थेची इमारत उभी करण्यासाठी कोण मध्ये येतो ते मी बघते. जे अधिकारी हे काम थांबवत आहेत त्यांची नावे मला कळवा मी पुढे बघते, असा दमच अमृता यांनी भरला आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ नाशिकच्या वतीने दीपावली स्नेहमिलन हा अमृता फडणवीस यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला होता.

यावेळी अमृता फडणवीस यांनी म्हंटलंय, ब्राह्मण महासंघ जात- धर्म, पंथ बाजूला ठेऊन अनेकांसाठी झटतो. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या इच्छा-आकांक्षा समजून घेतो.

ब्राह्मण असल्याचा गर्व आहे, परंतु आम्हाला आमची मार्केटिंग करता येत नाही असं मत नाशिकच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस यांनी पदासाठी कोणतीही मागणी केली नसताना ते मिळाले आहे. त्यामुळे पुढील काळात ब्राह्मण महासंघापुढील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असं आश्वासन देखील अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्या दरम्यान प्रभू श्रीरामाचे नाशिकला चरण लागले. या नगरीत येऊन मला धन्य वाटते आहे असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.