‘मला सीएम बदलण्याचा अनुभव, एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री केलं’; ऐन निवडणुकीत सत्तारांनी राजकारण तापवलं

विधानसभा निवडणुकीचं मतदान जसंजसं जवळ येत आहे. तसंतसं राजकीय आरोप-प्रत्यारोपानं चांगलाच जोर पकडला आहे, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपला घरचा आहेर दिला आहे,

'मला सीएम बदलण्याचा अनुभव, एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री केलं'; ऐन निवडणुकीत सत्तारांनी राजकारण तापवलं
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 3:30 PM

विधानसभा निवडणुकीचं मतदान जसंजसं जवळ येत आहे. तसंतसं राजकीय आरोप-प्रत्यारोपानं चांगलाच जोर पकडला आहे, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपला घरचा आहेर दिला आहे, तसेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे, सोबतच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. मला मुख्यमंत्री बदलण्याचा अनुभव आहे, असं वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले सत्तार? 

भाजपचे लोक खडखड करत आहेत, त्यांच्यासाठी मी म्हणालो की आम्ही मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो कारण मी गुवाहाटीला गेलो बिर्याणी खाल्ली आणि मुख्यमंत्री बदलला. एका शेतकऱ्याच्या मुलाला मी मुख्यमंत्री केलं, मला मुख्यमंत्री बदलण्याचा अनुभव आहे. मी हिंदुत्ववादी असलेल्या एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केलं, एमआयएमचा मुख्यमंत्री केला नाही. आम्ही बंड केलं नसतं तर भाजपचे लोक सत्तेत आले असते का? आणि पुढचे मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदेच होणार असं सत्तार यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी रावसाबेह दानवे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. रावसाहेब दानवे यांनी या निवडणुकीत मला मदत केली असती तर मला प्रचार करण्याची गरज पडली नसती. राजकारणात लपून छपून काम करणाऱ्या लोकांचे काय हाल होतात हे त्यांनी लोकसभेमध्ये पाहिलं आहे. मी लोकांकडे त्यांच्यासाठी मतं मागितली मात्र लोकांनी त्यांना मतं दिली नाहीत, त्याचं खापर ते माझ्या डोक्यावर फोडत आहेत, आतापर्यंत लोकांनी धक्के आणि लाथा सहन केल्या, मात्र हे खूप महागात पडतं एखाद्याला धक्का मारला तर लोक परत बुक्का मारतात हे मी त्यांना समजून सांगितलं, असा टोला यावेळी सत्तार यांनी लगावला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. सिल्लोड मध्ये उद्धव ठाकरे यांची जी सभा आहे, ती शिवसेनेची आहे की भाजपची हे कळत नाही. उद्धव ठाकरे येत आहेत त्यांचे मी स्वागत करतो, मात्र एक लाख वीस हजार मतांनी माझाच विजय होईल, असं सत्तार यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.