Sanjay Raut : ‘माझा ईडीवर विश्वास’ ईडीवर घणाघाती टीका करणारे संजय राऊत चौकशीआधी बॅकफूटवर?
ईडीचे सारख्या संस्थांना हाताशी धरुन सुडाचे राजकारण केले जात आहे. यामुळे लोकशाही धोक्यात आहे अशी एक ना अनेक विधाने संजय राऊत यांनी ईडीच्या कारभाराबाबत व्यक्त केली आहेत. अशा केंद्राच्या संस्थेवर सर्वाधिक टीका ही संजय राऊत यांनीच केली असेल. असे असताना शुक्रवारी दुपारी चौकशीला जाताना याच ईडी वर आपला विश्वास आहे. शिवाय चौकशीला सामोरे जाऊन सहकार्य करणे हे आपले कर्तव्य असल्याचे राऊत सांगत होते.
मुंबई : (ED) ‘ईडी’च्या दोन नोटीसा आणि तीन दिवसाचा वेळ घेतल्यानंतर अखेर शुक्रवारी (Sanjay Raut) खा. संजय राऊत हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहे. ईडी ही केंद्रीय संस्था असली तरी या संस्थेच्या कारभारावर संजय राऊत यांनी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, चौकशीला जात असताना त्यांचा याच संस्थेबाबतचा सूर काहीसा मवाळ झाला होता. ईडी ही एक (Central Organization) केंद्रीय संस्था तर आहेच पण यावर आपला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय यामध्ये काही राजकारण असल्याचे पत्रकाराने विचारताच यावर मी काही बोलणार नसल्याचे म्हणत या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. त्यामुळे सातत्याने आक्रमक असलेल्या राऊतांचा बदललेला सूर हा चर्चेचा विषय ठरत आहे.
नेमका काय आहे राऊतांवर आरोप?
गोरेगाव येथे संजय राऊत यांनी जमिन घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यापूर्वी चौकशीसाठी त्यांना दोन वेळेस नोटीस बजावण्यात आली होती. अखेर ते चौकशीला सामोरे जात आहेस. गोरेगाव पत्राचाळीतील जमिन घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या घोटाळ्याशी राऊतांचा काय संबंध आहे का याची पडताळणी केली जात आहे. असे असताना मात्र, गोरेगाव पत्राचाळ कुठे आहे ? हे देखील मला माहित नसल्याचे संजय राऊत यांनी म्हणले होते. पण आता प्रत्यक्ष चौकशीला सुरवात झाली असून नेमके काय बाहेर येते हे पाहणे महत्वाचे आहे.
‘माझा ईडीवर पूर्ण विश्वास’ एका वाक्याने खळबळ
ईडीचे सारख्या संस्थांना हाताशी धरुन सुडाचे राजकारण केले जात आहे. यामुळे लोकशाही धोक्यात आहे अशी एक ना अनेक विधाने संजय राऊत यांनी ईडीच्या कारभाराबाबत व्यक्त केली आहेत. अशा केंद्राच्या संस्थेवर सर्वाधिक टीका ही संजय राऊत यांनीच केली असेल. असे असताना शुक्रवारी दुपारी चौकशीला जाताना याच ईडी वर आपला विश्वास आहे. शिवाय चौकशीला सामोरे जाऊन सहकार्य करणे हे आपले कर्तव्य असल्याचे राऊत सांगत होते. त्यामुळे त्यांच्या या विधानाने अनेकांच्या भूवया तर उंचावल्याच प्रत्यक्ष वेळ आल्यावर काय होऊ शकते याचे प्रात्याक्षिकही पाहवयास मिळाले.
दोन नोटीसीनंतर चौकशीला हजेरी
जमिन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना सोमवारीच ईडीने पहिली नोटीस बजावली होती. पण राज्यातील राजकीय घडामोडी आणि आपले नियोजित कार्यक्रम असल्याचे सांगत राऊत हे चौकशीला हजर झाले नव्हते. पण त्यानंतही त्यांना एक नोटीस बजावण्यात आली होती. असे असतानाच गुरुवारी राजकीय नाट्यावर पडदा पडला असल्याने राऊत हे आता चौकशीला सामोरे गेले आहेत. चौकशीचा पहिला दिवस असताना आता काय होणार हे पहावे लागणार आहे.