मी मोदींचा राजीनामा मागणार नाही: शरद पवार

बारामती: पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशाच्या सर्वस्तरातून निषेध होत आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. मात्र देशाचं संरक्षण करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला अपयश आल्याचं हे निदर्शक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटलं. शरद पवार यांनी आज त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी […]

मी मोदींचा राजीनामा मागणार नाही: शरद पवार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

बारामती: पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशाच्या सर्वस्तरातून निषेध होत आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. मात्र देशाचं संरक्षण करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला अपयश आल्याचं हे निदर्शक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटलं. शरद पवार यांनी आज त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.

मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात असे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असत. मी मात्र आता राजीनाम्याची मागणी करणार नाही. पण याबाबत सरकारचे अपयश या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाल्याचं शरद पवार म्हणाले.

सध्याची वेळ ही राजकारण करण्याची नाही. संपूर्ण देश आज शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. निवडणुकीपूर्वी 56 इंच छाती असलेले नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग यांच्या सरकारवर असे हल्ले झाल्यानंतर, तुम्ही निषेध पत्र पाठवता अशी टीका करत सरकारला धारेवर धरायचे. आता मात्र पुलवामा इथे झालेल्या हल्ल्यानं नरेंद्र मोदींची अकार्यक्षमता सिद्ध झाल्याचं पवार  म्हणाले.

पुलवामा हल्ल्यानंतर मोदींकडून पाकिस्तानला 10 इशारे

आपण याच्यावर काही राजकीय भाष्य करु इच्छित नाही. मात्र नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला दहशतवादी हल्ले थोपविण्यात अपयश आलं हे मात्र यातून पुन्हा एकदा उघड झालं, असं शरद पवार म्हणाले. या हल्ल्यात शेजारच्या देशानं दहशतवाद्यांना मदत केली हे उघडपणे दिसतं. दहशतवाद्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आलेले आहेत आणि ते प्रशिक्षित होते याचा अर्थ त्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते, हे उघड आहे. संपूर्ण माहिती घेऊन पूर्वनियोजित पद्धतीने हा हल्ला घडविण्यात आल्याचं दिसतं. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला हा हल्ला थोपविण्यात अपयश आलं, असं शरद पवार यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या 

Pulwama Attack: माझा शब्द आहे, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ : मोदी  

पुलवामा हल्ल्यानंतर मोदींकडून पाकिस्तानला 10 इशारे

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.