Manoj Jarange Patil | सडून मरेल पण मागे हटणार नाही… अटक केली तर… मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा काय ?

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले.

Manoj Jarange Patil | सडून मरेल पण मागे हटणार नाही... अटक केली तर... मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा काय ?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 11:43 AM

छत्रपती संभाजीनगर | 28 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. या सगळ्या प्रकरणी आता सर्वत्र पडसाद उमटू लागले आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ‘ मी मागे हटणार नाही. त्यांचं म्हणणं १० टक्के आरक्षण घ्यावं, मात्र मी आरक्षण दिलं तरी थांबणार नाही. अटक केली तरी पोलीस ठाणे कुठेही आंदोलन करणार आहे. सडूनं मरेल पण मागे हटणार नाही.१० टक्के ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्यावं. मात्र आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे.किती दिवस सरकार दडपशाही करत ते बघू’ अस मनोज जरांगे पाटील म्हणाले. तुम्ही चौकशी नेमली मराठे तुमच्या विरोधात आहे.अटक केली तर सगळीकडे पांढर दिसेल, असा इशारा त्यांनी दिला.

आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित

यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली. मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित करत असल्याचं त्यांनी नमूद केले. परीक्षा सुरू असल्याने 3 मार्चपर्यंत आंदोलन स्थगित पण साखळी उपोषण सुरू आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

गृहमंत्र्यांकडून जातीय द्वेष सुरू

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, मी मागे हटणार नाही. मी 10टक्के आरक्षण स्वीकारणार नाही, अटक करून जेलमध्ये टाकले तरी मी हटणार नाही. मी जेलमध्ये देखील आमरण उपोषण करेन. ज्यांना 10 टक्के आरक्ष घ्यायचं त्यांनी घ्यावं पण आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहजे. सरकार किती दिवस दडपशाही करत ते बघू. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जातीय द्वेष करत आहे. मराठ्यांविषयी खुन्नस गृहमंत्री बंदूक दाखवून देत आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.

गोरगरीब मराठ्यांनी मतदान केलं, म्हणून तुमच्या नेत्यांनी तुम्हाला जवळ केलं. मी बोललो देवेंद्र फडणवीस यांना, मात्र याचा राग मराठ्यांच्या नेत्यांना आला. मराठा नेत्यांना जाता की नेता हवा आहे, असा प्रश्न जरांगे यांनी विचारला. तुमच्या स्वार्थासाठी मराठ्यांचं नुकसान करू नका. यांनी मला अटक केली तरीही मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावं, असेही जरांगे म्हणाले. गृहमंत्री जाणीवपूर्वक करत आहे तुम्ही अशांतता पसरवू देऊ नका. दूध का दूध पाणी का पाणी, होऊन जाऊ द्या, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ.
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण.
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल.
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.