मोदी सरकार जाईपर्यंत शर्ट घालणार नाही, पवारांसमोर तरुणाचा निर्धार

नाशिक : कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळतोय. त्याला वाचा फोडण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पाच एकरात असलेले कांदे जाळून शासनाचा निषेध केला. मात्र कुठलीही दखल न घेतल्याने लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगात असलेला शर्ट, बनियन आणि पायातील चप्पलही मोदींना पाठवली. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेपर्यंत अर्धनग्न अवस्थेत राहून या शासनाच्या विरोधात लढा सुरु ठेवणार आहे, अशी […]

मोदी सरकार जाईपर्यंत शर्ट घालणार नाही, पवारांसमोर तरुणाचा निर्धार
(संग्रहित फोटो)
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

नाशिक : कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळतोय. त्याला वाचा फोडण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पाच एकरात असलेले कांदे जाळून शासनाचा निषेध केला. मात्र कुठलीही दखल न घेतल्याने लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगात असलेला शर्ट, बनियन आणि पायातील चप्पलही मोदींना पाठवली. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेपर्यंत अर्धनग्न अवस्थेत राहून या शासनाच्या विरोधात लढा सुरु ठेवणार आहे, अशी घोषणा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नगरसुल येथील तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर केली. याबाबतचं निवेदनही त्यांनी पवारांना दिलं.

शेतमालाला बाजारभाव नाही, शेतकऱ्यांचं आंदोलन दडपलं जातंय, असं म्हणत तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी अर्धनग्न आंदोलन केलं आणि याबाबतचं निवेदन पवारांना दिलं. पवारांनीही मोदींवर सडकून टीका केली. मी अजून म्हातारा झालो नाही, मोदी सरकारला खाली बसवल्याशिवाय मी थांबणार नाही, असं पवार म्हणाले.

देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. दुर्दैवाने मोदी सरकारने गेल्या 5 वर्षात शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. मी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या पिकांची भाववाढ झाल्यावर मला संसदेत सवाल केले जायचे, तेव्हाही मी सांगायचो की मला खाणाऱ्यापेक्षा पिकवणारे महत्वाचे वाटतात. पिकवणाऱ्यांनी जर पिकवले नाही, तर खाणारे काय खातील? म्हणून मी पहिल्यांदा पिकवणाऱ्यांचा विचार करणार आणि शेतकरी विरोधी असलेल्या मोदी सरकारला खाली बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार शरद पवार यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेच्या व्यासपीठासमोर शेतकऱ्यांच्या भीतीपोटी खंदक खंदून ठेवल्याने शरद पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच पिंपळगाव येथे पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी कांदा मार्केट बंद ठेवण्याचा आदेश शासनाने काढला. शेतकऱ्यांचे या दिवशी झालेले नुकसान कोण भरून देणार अशी विचारणा शरद पवार यांनी निफाड येथील सभेतून केली.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.