तुकाराम मुंडे यांचाही रेकॉर्ड मोडला; महिला IAS अधिकारी भाग्यश्री बानायत यांची महिनाभरात तिसऱ्यांदा बदली
भाग्यश्री बानायत यांची पुन्हा पडली झाल्याने तुकाराम मुंडे यांचा रेकॉर्ड तोंडल्याची चर्चा होऊ लागली आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा बदली झाली आहे.
नाशिक : आपल्या कारभारामुळे अनेकदा बदली झालेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे हे सर्वांना परिचित आहे. कडक शिस्तीचे म्हणून तुकाराम मुंडे अनेक राजकारण्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना नकोसे वाटतात त्यामुळे त्यांच्या बदलीचा रेकॉर्ड आहे. तुकाराम मुंडे यांच्या कारकिर्दीत त्यांची बदली हाच अनेकदा चर्चेचा विषय राहिला आहे. 16 वर्षात 20 वेळा बदली झालेले अधिकारी हे एकमेव अधिकारी असावे. बदलीचा रेकॉर्ड करणारे तुकाराम मुंडे यांची बदली होत असतांना निदान महिना भराचा तर कालावधी मध्ये गेलेला आहे. पण नुकत्याच नाशिक महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्त झालेल्या भाग्यश्री बानायत यांच्या नियुक्तीने तुकाराम मुंडे यांचा रेकॉर्ड मोडला आहे. भाग्यश्री बनायत यांची महिनाभरातच तिसऱ्यांदा बदली झाली आहे. त्यामुळे तुकाराम मुंडे यांच्या नावावर जसा कमी वर्षात जास्त बदल्या तसाच काहीसा रेकॉर्ड म्हणजे कमी काळात जास्त बदल्या असा रेकॉर्ड भाग्यश्री बानायत यांच्या नावावर झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या बदल्यांमध्ये भाग्यश्री बानायत यांची ही महिनाभरातील तिसरी बदली आहे.
शुक्रवारी सायंकाळी आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदली यादीत भाग्यश्री बानायत यांचेही नाव आहे, बानायात यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच नाशिक मनपात आयएएस दर्जाचे अतिरिक्त आयुक्त लाभले आहे.
भाग्यश्री बानायत या स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून परिचित आहे, शिर्डी संस्थानमध्ये त्यांनी केलेला उत्तम कार्यभार आजही चर्चेत आहे.
भाग्यश्री बानायात यांची शिर्डी संस्थान येथे 01 सप्टेंबर 2021 ला नियुक्ती झाली होती, त्यानंतर 29 नोव्हेंबरला भाग्यश्री बानायत यांची बदलीचे आदेश आले होते. त्यात त्यांची बदली विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झाली होती.
त्यानंतर आठवडाभरातच भाग्यश्री बानायत यांची नाशिकच्या विभागीय महसूल कार्यालयात अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
त्यानंतर पुन्हा 30 डिसेंबरला सायंकाळी उशिरा निघालेल्या बदली आदेशांच्या यादीत त्यांचे नाव आले आहे, त्यामध्ये नाशिक मनपाच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महिनाभरातच भाग्यश्री बानायत यांची बदली करण्यात आली असल्याने शिंदे-फडणवीस सरकारची जोरदार चर्चा होत असून यानिमित्ताने तुकाराम मुंडे यांच्या बदलीचा रेकॉर्डही चर्चेत आला आहे.