Pooja Khedkar : बुडत्याचा पाय खोलात ! पूजा खेडकर यांची आईही अडकली, व्हायरल व्हिडीओनंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. पूजा खेडकर यांच्या आईचा धमकी देतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून याप्रकरणी आता पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा ताखल करण्यात आला आहे.

Pooja Khedkar : बुडत्याचा पाय खोलात ! पूजा खेडकर यांची आईही अडकली,  व्हायरल व्हिडीओनंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पूजा खेडकरचं अख्खं कुटुंब वादात
Follow us
| Updated on: Jul 13, 2024 | 9:02 AM

IAS प्रोबेशनर अधिकारी डॉ. पूजा खेडकर आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यांचे विविध कारनामे समोर येत असून त्यामुळे त्यांच्या अडचणी दिवसेंदिवेस वाढतच चालल्या आहेत. आता त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबियही अडकताना दिसत आहेत. पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांचा धमकी देतानाचा एक व्हिडीओ समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. बंदुक घेऊन मुळशीतल्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा हा व्हिडिओ आहे. आता याप्रकरणी खेडकर यांच्याविरोधात पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये मनोरमा या बंदबक दाखवून एक शेतकऱ्याला धमकावत असल्याचं दिसत होतं. याचप्रकरणी त्यांच्यावर गु्न्हा दाखल झाला आहे. मनोरमा खेडकर यांच्यासह दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, दोन पुरुष बाउंसर, दोन महिला बाउन्सर आणि घटनेवेळी त्यांच्यासोबत आलेल्या इतर गुंड व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल झाला. कलम 323, 504, 506, 143, 144, 147, 148, 149, 3, 25 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये बेकायदा पिस्तूल बाळगून धमाकावल्याप्रकरणीचं सुद्धा कलम लावण्यात आलं आहे. त्यामुळे आता मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसतंय.

नेमकं काय झालं ?

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर च्या आई मनोरमा खेडकर यांचा मुळशी तालुक्यातील धडवली गावातला पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती, ती ताब्यात घेताना शेजाऱ्यांचीही न्यायप्रविष्ट असलेली जमीन ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. याला जेव्हा शेजारची जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी विरोध केला, तेव्हा मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन तेथे पोहोचल्या, आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावल होतं. गेल्या वर्षी जूनमध्ये हा प्रकार घडला होता. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.