पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी केलेला अर्ज पटियाला हाऊस न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकरनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज यावर सुनावणी पार पडली.

पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Aug 12, 2024 | 12:28 PM

Pooja Khedkar Anticipatory Bail Hearing : हकालपट्टी झालेल्या वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पूजा खेडकर यांना तात्काळ अटक करण्याची गरज नाही, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी केलेला अर्ज पटियाला हाऊस न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकरनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज यावर सुनावणी पार पडली.

बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनावरील आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना मोठा दिलासा दिला आहे. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना तात्काळ अटक करण्याची गरज नाही. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. त्या चौकशीदरम्यान त्यांना अटक करण्याची गरज नाही, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.

अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

पूजा खेडकर यांच्या विरोधात अनेक तक्रारी नोंदवण्यात आली आहे. त्यातील एका तक्रारीत नागरी सेवा परीक्षेत परवानगीपेक्षा जास्त संधी मिळविण्यासाठी स्वत:ची खोटी ओळख करून दिल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. युपीएससीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पूजा खेडकर यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पोलिसांकडून त्यांना अटक होण्याची शक्यता होती. यानंतर पूजा खेडकर यांनी दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.

सुनावणी होईपर्यंत अटक करू नये

या अर्जावर सुनावणी करताना पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. हा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी 9 ऑगस्टला पार पडणार होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाकडून या सुनावणीसाठी 12 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यानुसार आज दिल्ली हायकोर्टात न्यायाधीश सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वरिष्ठ वकील सिध्दार्थ लुथरा यांनी पूजा खेडकर यांची बाजू मांडली. तर यूपीएससीकडून नरेश कौशिक यांनी बाजू मांडली.

यावेळी नरेश कौशिक यांनी पूजा खेडकर या अवैध मार्गाने आयएएस व्यवस्थेत आल्या. त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. पण त्यानंतर कोर्टाने खेडकर यांच्या अर्जावर सुनावणी होईपर्यंत अटक करू नये, असे आदेश दिले आहेत. यामुळे तिला मोठा दिलासा मिळाला आहे.

आयएएस पद देखील रद्द

मात्र पूजा खेडकरने प्रशिक्षणार्थी असताना स्वतंत्र दालन, शिपाई किंवा इतर गोष्टींसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलीला हवं ते मिळावं म्हणून वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला होता. यामुळे पूजा खेडकर चर्चेत आली. त्यात आता तिचे आयएएस पद देखील रद्द करण्यात आले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.