इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मोर्चा, मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाजी, दुचाक्या ढकलत निषेध

गेल्या काही दिवसांत इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव दररोज नवी उसळी घेतायत.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मोर्चा, मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाजी, दुचाक्या ढकलत निषेध
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 4:31 PM

इचलकरंजी : गेल्या काही दिवसांत इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव दररोज नवी उसळी घेतायत. याच इंधनाच्या भाववाढीविरोधात आक्रमक होत इचलकरंजी काँग्रेसच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुचाकी वाहने ढकलत अनोख्या पध्दतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Ichalkaranji Congress Agitation Against Modi GOVT Over Incresing Fuel Rate)

पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढ कमी करावी या मागणीसाठी इचलकरंजी काँग्रेसच्यावतीने मलाबादे चौक ते प्रांत कार्यालय या प्रमुख मार्गावरुन मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देत हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढी विरोधात निषेधात्मक घोषणा देत निदर्शने केली.

मोदी सरकारच्या कार्यकाळातील इंधन दरवाढीचा चढता आलेख विविध लक्षवेधी फलकांच्या माध्यमातून काँग्रेसने मोर्चात मांडला. तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंगाच्या काळात काँग्रेसने इंधन दरवाढीवर नियंत्रण ठेवले होते. मात्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारने भांडवलदारांचे खिसे भरून सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारायला सुरवात केली आहे. काँग्रेस सत्तेवर असताना इंधन दरवाढीवर टिका करणारे भाजपचे मंत्री आता मात्र बोलती बंद करून शांत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली.

केंद्र सरकारचे सर्व कायदे जनतेविरोधी असून सर्वसामान्यांचे शोषण मोठ्या प्रमाणात होत आहे. इंधनाचे दर वाढल्याने देशांतर्गत संपूर्ण अर्स्थव्यवस्था उद्धवस्त झाली आहे. महागाईने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. या सर्व बाबींचा विचार करून पेट्रोल-डिझेलवरील अबकारी दर कमी करावेत व घरगुती गॅसचे दर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला.

इचलकरंजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे, शशांक बावचकर यांनी इंधन दरवाढीविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या. मागणीचे निवेदन शिरस्तेदार उदयसिंह गायकवाड यांनी स्वीकारले. मोर्चात काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हे ही वाचा

LIVE: भाई जगताप यांनी घेतली शरद पवारांची भेट

अभिजित बांगरांचा दणका, वाशी रुग्णालयातील 17 डॉक्टरांवर वेतन कपातीची कारवाई

West Bengal : दिलीप घोष यांच्या सभेपूर्वी भाजपच्या दोन गटांत हाणामारी, टीएमसी नेत्यांच्या प्रवेशावर कार्यकर्ते नाराज

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.