Video | लेकीच्या नावावर घर करण्याचा नांदेडच्या चिंचोली गावाचा नवा आदर्श!
ideal village nanded to build a house in the name of Girl
नांदेड : लेकीबाळीच्या नावावर घर (house in the name of Girl) करण्याचा आदर्श लोहा तालुक्यातील चिंचोली गावाने घालून दिलाय. या गावातील प्रत्येक घर हे महिलेच्या नावाने ओळखल्या जात असून घरांना लेकीचं नाव दिलंय. (ideal village nanded to build a house in the name of Girl)
चिंचोली गावचे सरपंच गोविंद जाधव यांनी हा उपक्रम राबवलाय. त्यास गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय. माझं गांव सुंदर गाव हे अभियान राबवत या गावाने आता कात टाकलीय. त्यामुळे चिंचोली गांव हे नांदेड जिल्ह्यात कौतुकाचा विषय बनलंय.
निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा म्हणून शासन स्तरावर नेहमीच प्रयत्नांची शिकस्त केली जाते. अगदी घर घेताना ते घर जर महिलांच्या नावे घेतलं तर घराच्या किमतीच्या रकमेत सूटही दिली जाते.
नांदेडच्या चिंचोली गावात महिला मुलींच्या नावे घरं करुन त्यांना एकप्रकारे सन्मान देण्याचा आदर्श निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. चिचोंली ग्रामस्थाचं आणि सरपंचाचं जिल्ह्यात या निर्णयाने कौतुक होतंय. (ideal village nanded to build a house in the name of Girl)
पाहा व्हिडीओ :
हे ही वाचा :
आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल; शरद पवारांचं भाकीत
विकृत नवऱ्याने लावले बायकोचे गावभर पोस्टर्स; मजकूर वाचाल तर धक्काच बसेल