मोठी बातमी: चालकाने मास्क न घातल्यास रिक्षा होणार जप्त; प्रशासनाचा मोठा निर्णय

पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाकडून लोकांना वारंवार मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, लोक या सूचना गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. | Coronavirus

मोठी बातमी: चालकाने मास्क न घातल्यास रिक्षा होणार जप्त; प्रशासनाचा मोठा निर्णय
औरंगाबादमध्ये तब्बल 35 हजारांपेक्षा जास्त रिक्षाचालक असून ते दररोज प्रवाश्यांना घेऊन शहरातील गल्लोगल्ली आणि इतरत्र फिरत असतात.
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 10:40 AM

औरंगाबाद: कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता औरंगाबाद शहरात रिक्षाचालक विनामास्क वाहन चालवताना आढळला तर त्याची रिक्षा (Autrikshaw) जप्त केली जाईल. या निर्णयाचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. (If auto rickshaw driver not wearing masks auto will be seized by police)

औरंगाबादमध्ये तब्बल 35 हजारांपेक्षा जास्त रिक्षाचालक असून ते दररोज प्रवाश्यांना घेऊन शहरातील गल्लोगल्ली आणि इतरत्र फिरत असतात. त्यांनी मास्क न परिधान केल्यास कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाकडून लोकांना वारंवार मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, लोक या सूचना गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून आता रिक्षाचालकांवर कारवाई केली जात असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिली.

होम आयसोलेशन पर्याय आता बंद

कोरोना बाधितांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता औरंगाबाद महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधितांची संख्या ही आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अनेक कोरोना रुग्णांच्या घरातील लोकांनाही व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या वतीने होम आयसोलेशन पर्याय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आयसोलेशनच्या ऐवजी बाधितांना कोविड केअर सेंटर किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागेल. शहरातील कोरोना बाधितांची संख्या ही दहा टक्क्यांनी वाढत चाललेली आहे. तसेच आगामी काळामध्ये देखील रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा बचावाचा उपाय म्हणून महानगरपालिकेने पाऊल उचलले आहे.

संबंधित बातम्या:

नागपुरात कोणत्याही कार्यक्रमासाठी आठ दिवसआधी परवानगी बंधनकारक; संचारबंदीचीही मागणी वाढली

(If auto rickshaw driver not wearing masks auto will be seized by police)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.