आंदोलन जिरवायचे नसेल तर जरांगे यांना सल्ला आहे… प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगे यांना सल्ला काय ?

Maratha Reservation : आम्ही अण्णा पाटलांचे आंदोलन पाहिलं आहे. त्यांचे आंदोलन जिरवण्यात आले. आता उभे केलेले आंदोलन जिरवायचे नसेल, तर मनोज जरांगेंना निवडणुकीत उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला. निवडणुकीत उभे राहिला नाहीत, तर इथला निजामी मराठा तुम्हाला कधी संपवेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही.

आंदोलन जिरवायचे नसेल तर जरांगे यांना सल्ला आहे... प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगे यांना सल्ला काय ?
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 12:15 PM

पुणे | 28 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची लाट राज्यात कित्येक महिन्यांपासून उसळली आहे. राज्यात उभं केलेलं हे (मराठा) आंदोलन जिरवायचं नसेल तर तुम्हाला निवडणुकीत उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही, असा सल्ला बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. आरक्षणाचा प्रश्न शांततेत सोडवता आला असता. पण ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद लावला आहे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे आणि मराठा समाजाचे ताट वेगळे असले पाहिजे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. पण माझा जरांगे पाटील यांना प्रेमाचा सल्ला आहे की, आता उभे केलेले आंदोलन जिरवायचे नसेल, तर तुम्हाला निवडणुकीत उभे राहिल्याशिवाय पर्याय नाही.

निवडणुकीत उभे राहिला नाहीत, तर इथला निजामी मराठा तुम्हाला कधी संपवेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. गरिबांच्या चळवळी कधीच उभ्या राहू दिल्या नाहीत. आपण गरिबांच्या आणि उपेक्षितांच्या चळवळी उभ्या करत आहोत या चळवळीमध्ये एकजूट होणे महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केलं. मंगळवारी पुण्यातील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता परिवर्तन महासभा झाली. त्यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते.

आपले अधिकार शाबूत ठेवण्याची ही लढाई

आगामी निवडणूक पक्षाची नाही, तर ती आपली स्वतःची आहे. इथे सत्तेवर कोणाला बसवायचे याची निवडणूक नाही, तर या ठिकाणी आपले अधिकार शाबूत ठेवण्याची ही लढाई आहे, असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले. उद्याची व्यवस्था काय असेल, याची चुणूक या सरकारने दाखवली आहे, त्यामुळे आतापासून सावध राहा, असे आवाहनही त्यांनी केले.

महाविकास आघाडीशी युती होईल का सांगता येत नाही

मार्च महिन्यांत निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. आपल्या समोरचं लक्ष कायम ठेवलं पाहिजे ते म्हणजे, पुन्हा आरएसएस-भाजपचं सरकार केंद्रात सत्तेत येणार नाही ही दक्षता आपण घेतली पाहिजे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. उद्या युती होईल न होईल सांगता येत नाही. व्हायला पाहिजे अशी आपली इच्छा आहे. पण आपल्या इच्छेचं काय करणार ? कारण, मोदी हा रिंगमास्टर बसलेला आहे. त्या रिंगमास्टरने जेलमध्ये जावं लागेल म्हटलं, तर हा म्हणतो मी तुझ्याच जेलमध्ये येतो कशाला जेलमध्ये घालवतो अशा घटना होतील. काहीही झालं तरी आपले गणित पक्कं करून घ्यायचं आहे. फुले, शाहू, आंबेडकर विचाराच्या प्रत्येक मतदाराने 5 मतदार जोडले पाहिजेत. ज्या दिवशी हे पाचजण एकत्र येतील तेव्हा भाजप केंद्रात येणार नाही. ही पक्षाची नाही तर आपली स्वतःची निवडणूक असणार आहे, असे ते म्हणाले.

मुस्लिमांनी वंचितांच्या आंदोलनात सहभागी व्हावे

मुस्लीम समाज स्वतःची सुरक्षितता राजकीय पक्षांत शोधतो. त्यांना सांगतो की, राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षा देणार नाहीत. तुम्ही या वंचितांच्या सभेत आणि आंदोलनात सहभागी झाला, तर तिथेच त्याला सुरक्षितता मिळेल हे लक्षात घेतलं पाहिजे असे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.