Monsoon : अखेर प्रतिक्षा संपली, कर्नाटकातून मान्सूनचे कोकणात आगमन, बळीराजाला दिलासा

29 मे रोजीच केरळात आगमन झालेल्या मान्सूनचा पुढे प्रवास खडतर झाल्याने राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास उशिर झाला होता. आगमनानंतर दोनच दिवसांमध्ये केरळ राज्य आणि कर्नाटक किनारपट्टी व्यापून टाकल्याने राज्यातही दणक्यात आगमन होणार असे वाटत असतानाच मान्सूनचा वेग मंदावला होता. गेल्या आठवड्याभरापासून अरबी समुद्रापासून मान्सूनची प्रगती झाली नव्हती

Monsoon : अखेर प्रतिक्षा संपली, कर्नाटकातून मान्सूनचे कोकणात आगमन, बळीराजाला दिलासा
राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे.
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 3:51 PM

मुंबई : वेळेपूर्वी नाही किमान नियमित वेळी तरी (Monsoon) मान्सूनने हजेरी लावावी अशी अपेक्षा केवळ शेतकरीच नाहीतर प्रत्येक नागरिकाकडून केली जात होती. अखेर तीन दिवस उशिरा का होईना महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात मान्सूनची गाडी अडकली होती ती मार्गस्थ झाली असून कोकणात आगमन झाले आहे. त्यामुळे (Kharif Season) खरिपाच्या पेरणीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील आठवड्यापर्यंत मान्सून पू्र्ण क्षमतेने दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Meteorological Department) हवामान विभागाच्या माहितीनुसार तळकोकणात मान्सून 7 जून रोजी दाखल झाला होता तर पुढे राज्यात येण्यासाठी तीन दिवस उशिर झाला आहे.

मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण

29 मे रोजीच केरळात आगमन झालेल्या मान्सूनचा पुढे प्रवास खडतर झाल्याने राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास उशिर झाला होता. आगमनानंतर दोनच दिवसांमध्ये केरळ राज्य आणि कर्नाटक किनारपट्टी व्यापून टाकल्याने राज्यातही दणक्यात आगमन होणार असे वाटत असतानाच मान्सूनचा वेग मंदावला होता. गेल्या आठवड्याभरापासून अरबी समुद्रापासून मान्सूनची प्रगती झाली नव्हती. पण आता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच तळकोकणात आगमन झाले असून पुढील काही दिवसांमध्ये मान्सून राज्यात व्यापेल असा आशावाद आहे.

हे सुद्धा वाचा

तरच वेळेत पेरण्या..

अद्यापही खरिपातील पेरण्यांना उशिर झालेला नाही. पण पाऊसच नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन होणार यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपली होती. पण हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे पावसाने हजेरीच लावलेली नाही. अजूनही परेणृीला उशिर झाला नाही, आता कोकणात आगमन झाल्याने वेळेत मान्सून राज्यात सक्रीय झाला तर सर्वकाही वेळेत होणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले.

गोव्यातही मान्सून दाखल

आता कुठे मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याचा वेग वाढला असून गोव्यात राजधानीसह डिचोली, सत्तरी, वाळपाई, सांगे, काणकोण तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. आता नैऋत्य भागातून येणाऱ्या मौसमी वाऱ्यांचा वेग वाढल्याने मान्सूनने पश्‍चिम आणि मध्य भारताकडे वाटचाल सुरु केल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.