‘मराठा अधिकाऱ्याला त्रास झाला तर…,’ मनोज जरांगे यांनी काय केलं आवाहन
मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी संभाजीनगरात आपल्या शांतता मोर्चा रॅलीच्या पहिल्या टप्प्याचा समारोप करीत असल्याचे सुतोवाच केले आहे. मराठ्यांना त्या वळणावर जायचं नाही. मी शेवटचं टोक गाठत नाही असे मनोज जरांगे यांनी संभाजीनगरातील रॅलीत भाषण करताना सांगितले.
मराठा आरक्षणासाठी का विरोध करताय…मराठ्यांशिवाय तुमचं काही चालत नाही, मग कशाला विरोध का करता? कशाला आमच्या नादी लागता? इथे चपलासकट पाया पडल्याशिवाय पर्यायच नाही. ही लय बेक्कार जात आहे मराठ्यांची… उद्या सकाळी मला गोळ्या घाला. तरीही मी तुमचा होणार नाही. तुम्ही सहा ट्रक भरून नोटा आणल्या तरी मी म्हणेल विहिरीत टाक. तुम्ही म्हणाला सकाळी सकाळीच तुम्हाला मंत्रीपद देतो तरी मी घेत नसतो. माझ्याकडे काहीच चालणार नाही. माझ्याकडे मधल्या काळात मंत्री, आमदार येत होते पण आपण कोणापुढे झुकलो नसल्याचे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा अधिकाऱ्यांना धमकावयाचे काम करायचं नाही असा इशाराही जरांगे यांनी मराठवाडा येथील शांतता रॅलीत केला आहे.
मी फक्त माझ्या समाजाची इज्जत करतो. बाकीच्यांची करतो. पण माझ्या समाजाला त्रास देणाऱ्यांची अजिबात इज्जत करीत नाही. एकटाच 50 ते 55 टक्के मराठा आहे. मग काय गरज आहे आम्हाला कोणाची ? फक्त त्यांनी आम्हाला जी वस्तू हातात घ्यायची ती घ्यायला लावू नका. मराठ्यांना त्या वळणावर जायचं नाही. त्यामुळे म्हणतो वेळची गरज आहे. मी शेवटचं टोक गाठत नाही असे मनोज जरांगे यांनी भाषण करताना सांगितले. एखाद्या मराठ्याच्या अधिकाऱ्याकडे गेले तर तू मराठा आहे म्हणून काम करीत नाही का असं धमकवायचे ? त्याला काम करायचं नसलं तरी काम करावं लागायचं. डॉक्टरांकडे जाणार आणि मराठा आहे म्हणून बिल कमी करीत नाही का ? वकिलाकडेही जायचं. मराठ्यांचा आहे म्हणून फि जास्त घेतो का ? म्हणून वकिलाला बोलायचं. मराठ्यांचा मंत्री आहे म्हणून काम करीत नाही का असं मंत्र्यांना म्हणायचं.पदाचा आणि जातीचा काय संबंध आहे असा सवालच मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
नाहीतर छगन भुजबळ सारख्या भंगार लोकाचं…
मराठ्यांनो कोणी मराठा अधिकारी अडचणीत आला तर बघ्याची भूमिका घेऊ नका. सर्वांनी त्याच्या मदतीला जायचं आहे. अजिबात मागे हटायचं नाही. सपोर्ट करावा लागणार आहे. भांडण नाही करायचं. तुम्ही फक्त उभं राहायचं आहे. दहशत कमी होते. तुम्ही उभे राहात नसल्याने ही दहशत वाढली आहे. कुणाच्या पायाही पडू नका. तुमच्या हातात सत्ता दिली म्हणजे तुम्ही अन्याय करणार का ? असा सवालच मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. मराठा अधिकाऱ्याला कुणी त्रास दिला तर मदतीला जायचं आहे, नाही तर छगन भुजबळ सारख्या भंगार लोकांचं फावतं असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.