राज्यपालपद झेपत नसेल तर…, उदयनराजे भोसले यांचा प्रहार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली गेली. अशा व्यक्तींवर अॅक्शन घ्या.
पालघर – भाजपचे प्रवक्ते सुधांसू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाला पाच वेळी माफी मागितली होती, अशी टीका केली. त्यावर उदयनराजे भोसले म्हणाले, देव कोणी बघीतला नाही. पण, शिवाजी महाराज यांच्या रुपाने देव बघीतला गेला. राजेशाहीत लोकशाहीला सहभागी करून घेतले. लोकशाहीचा ढाचा शिवाजी महाराज यांनी तयार केला. त्यांच्याबद्दल कुणी बोलले असतील. किंवा राज्यपाल कोश्यारी यांनी केलेलं वक्तव्य असो. अशा व्यक्तींनी आधी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचावा. उदयनराजे भोसले हे आज वसईत होते. यावेळी ते बोलत होते.
अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली गेली. अशा व्यक्तींवर अॅक्शन घ्या. यासाठी केंद्रीय गृहमंत्री यांनी पत्र देणार आहे. प्रत्येकाला जग सोडून जावं लागतं. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराज होऊन गेले. तरीही महाराजांबद्दल आदर व्यक्त केला जातो, असंही उदयनराजे भोसले यांनी सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या या लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली असावी. त्यांच्या अंगात विकृती असावी. जातीपातीच्या पलीकडं जाऊन या देशासाठी सत्यशोधक मार्गानं छत्रपती शिवाजी महाराज यांनी योगदान दिलं. महाराजांबद्दल बोलताना जबाबदारीनं बोललं पाहिजे. अशा बेताल वक्तव्यामुळं अनेक शिवभक्तांची मनं दुखावली जातात. त्याचा उद्रेक होतो, याची जाणीव असावी.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज नात्यानं मी अशा वक्तव्याचा निषेध करतो. अशा वक्तव्याचं समर्थन कोण करणार. राज्यपाल हे मोठं पद आहे. झेपत नसेल, तर बाजूला केलं पाहिजे, असा प्रहारही उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर केला.