विद्यार्थ्यांनो तुम्ही ‘अशी’ चुक करूच नका, अन्यथा तुमची पाच वर्षे जाणार वाया, नवा निर्णय काय?
राज्य मंडळाकडून कितीही कठोर भूमिका घेतली गेली तरी स्थानिक पातळीवर पेपर फूटी होत असल्याच्या गंभीर घटना समोर आल्या आहे. यापूर्वी प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद : राज्य मंडळाने ( Stare Board ) कितीही नियम लावले तरी कॉपीचा ( Paper Copy ) सुळसुळाट काही केल्या कमी होत नाहीये. प्रश्नपत्रिका ( question paper ) फुटण्याचे प्रमाणही वाढतच चालले आहे. अशातच अलिकडच्या काळात मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका व्हायरल ( Social Media Viral ) होण्यास मदत होते. त्यामुळे राज्य मंडळाने कठोर पाऊले काही दिवसांपूर्वी उचलले होते. त्यामध्ये राज्य मंडळाने एक समिती स्थापन करून याबाबत निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत राज्य मंडळाने त्याबाबत सविस्तर आदेशच काढले आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहावी बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंडळाने आता दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका मोबाईलच्या माध्यमातून व्हायरल केल्यास परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला पाच वर्षे डिबार करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पाच वर्षे परीक्षा देण्यापासून निलंबित केले जाईल.
मागील काही परीक्षांचा अनुभव पाहता इंजीनियरिंग, फार्मसी च्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या पूर्वीच सोशल मीडियावर व्हायराल झाल्याची गंभीर बाब समोर आली होती. अशा गंभीर बाबी रोखण्यासाठी राज्य मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
राज्य मंडळाकडून कितीही कठोर भूमिका घेतली गेली तरी स्थानिक पातळीवर पेपर फूटी होत असल्याच्या गंभीर घटना समोर आल्या आहे. यामध्ये मोबाइलच्या माध्यमातून काही मिनिटांतच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
राज्य मंडळाने ज्या ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहे. त्या केंद्रासहित सर्व शाळांना सूची पाठविली आहे. त्यामुळे शाळांच्या माध्यमातून राज्य मंडळाने ही कठोर भूमिका घेतल्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला आहे.
त्यामध्ये काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने हा आदेश जारी केला आहे. यामध्ये मोबाईलवर प्रश्नपत्रिका व्हायरल केल्यास पाच वर्षे परीक्षेपासून निलंबित याशिवाय फौजदारी गुन्हाही दाखल होणार आहे.
कॉपी प्रकरणात इतर कुणाचा सहभाग असल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असा नियमच लागू करण्यात आला आहे. यापूर्वी कॉपी आढळून आल्यास तीन वर्षे निलंबित केले जात होते.
पेपर फुटी ला आळा बसण्यासाठी राज्य मंडळांने बारा पानांची शिक्षा सूची जारी केली असून तिचे पालन करण्याचे आदेश शाळांना आणि परीक्षा केंद्रांना दिले आहे. त्यामुळे येत्या काळात हे कॉपी प्रकरण थांबेल का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.