खरे मर्द असाल तर ते 27 फोटो आणि पाच व्हिडीओ… मोहित कंभोज यांनी राऊत यांना घेरलं
राऊत यांनी आपल्याकडे सत्तावीस फोटो आणि पाच व्हिडीओ असल्याचा दावा केलाय. त्यावरून भाजपचे मोहित कंभोज यांनी राऊत यांना खुलं आव्हान दिलंय. तर, भाजप आमदार नितेश राणे यांनी चीनला गेला तेव्हा किती खर्च केले? असा सवाल केलाय.
मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : मकाऊ येथील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या त्या कसिनोतल्या फोटोवरून पुन्हा एकदा आरोपांचा खेळ सुरू झालाय. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आपल्याकडे सत्तावीस फोटो आणि पाच व्हिडीओ असल्याचा दावा केलाय. त्यावरून भाजपचे मोहित कंभोज यांनी राऊत यांना खुलं आव्हान दिलंय. तर, भाजप आमदार नितेश राणे यांनी चीनला गेला तेव्हा किती खर्च केले? असा सवाल केलाय. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही राऊत यांच्यावर टीका केलीय. एकूणच राऊत यांच्या या आरोपानंतर भाजप नेते आक्रमक झाल्याचे दिसून येतंय.
संजय राऊत यांनी बावनकुळे यांचे कसिनोतला फोटो ट्विट केला. त्यामुळे भाजप विरुद्ध राऊत असा सामना सुरू झाला. फक्त, एकच नाही तर आणखी सत्तावीस फोटो आणि पाच व्हिडीओ आहेत असा दावा राऊत यांनी केला. त्यावरूनच मोहित कंबोज यांनी राऊत यांना आव्हान दिलंय. तुम्ही जर खरे मर्द असाल तर एक फोटो आणि एक व्हिडीओ टाकून दाखवाच असे खुले आव्हान कंभोज यांनी दिलंय.
महाराष्ट्राचे पोपट मिया सलीम माननीय संजय राऊत यांना आव्हान देतो. तुम्ही म्हणत होता की तुमच्याकडे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचे सत्तावीस फोटो तीन व्हिडीओ आहेत. माझी पोपट संजय राऊत यांना आवाहन आहे तुम्ही जर खरे मर्द असाल तर एक एक फोटो एक व्हिडीओ टाकून दाखवा असे मोहित कंभोज म्हणालेत.
संजय राऊत यांच्या या आरोपानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांच्या चीनच्या दौऱ्यातील दौर्यातील साथीदार आणि खर्चावर बोट ठेवलं. बावनकुळे साहेब कुठेही चुकले नाहीत. नेमकं तीन तासात साडे तीन कोटी कसे खर्च करतील? मग तुम्ही जेव्हा चीनला गेले होते. तुम्हाला हवं असेल तर कोणाबरोबर ते पण सांगतो? तुमची इच्छा असेल तर? मग तेव्हा तुम्ही किती खर्च केले? असा सवाल उपस्थित केला.
शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही राऊत यांच्यावर टीका केलीय. त्या करन्सी तो कसिनोमध्ये किती हरला? किती जिंकला? ते तुमच्याकडं मागायला आले का? काय करायचं तुम्हाला त्याच्याशी? गेलं का असतील कसिनोमध्ये काय झालं? आयुष्यामध्ये दारू पिली काय झालं? वाईट झालं? राजकारणातले सर्व लोक काही संन्यासी असतात का? कुणाशी कोणाचे काय संबंध आहेत कोण कोणाच्या बेडरूमध्ये गेला हा राजकारणाचा विषय असू शकत नाही. म्हणून संजय राऊतची मानसिकता ढासळलेली आहे. निश्चितच झाले आहे की त्यांनी आता स्वतःचा उपचार करून घ्यावा, असे खडे बोल शिरसाट यांनी सुनावले आहेत.
भाजपने आदित्य ठाकरे यांचा एक फोटो ट्विट करत ठकारे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर राऊत यांनी ते डाइट कोकचा टीन आहे. नीट चेक करा बरं का. मोदींचे असे किती फोटो दाखवू. मोदी जे पितात तेच आदित्य ठाकरे पित होते. असा पलटवार केलाय. पण, हे एवढे घाबरले त्यांना भान नाही की आपण आदित्य ठाकरेंचा कोणता फोटो ट्विट करतोय. इतका डरपोक पक्ष हातामध्ये इडी आणि सीबीआय आहे म्हणून यांच्यातली मर्दानगी जागी आहे. अशी टीकाही राऊत यांनी केलीय.