पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार की नाही? सुप्रीम कोर्टात घडली महत्वाची घडामोड

निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाच्या दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या दरम्यान सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे.

पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार की नाही? सुप्रीम कोर्टात घडली महत्वाची घडामोड
Pune LokSabha By ElectionImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 11:55 PM

नवी दिल्ली | 08 जानेवारी 2024 : भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणुका घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते. निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाच्या दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या दरम्यान सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार गिरीश बापट विजयी झाले होते. त्यांनी कॉंग्रेसच्या मोहन जोशी यांचा पराभव केला होता. खासदार गिरीश बापट यांचे मार्च 2023 मध्ये निधन झाले. तेव्हापासून पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त होती.

पुणे लोकसभेच्या रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात यावी म्हणून निवडणूक आयोगाविरोधात कॉंग्रेसने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर आपली बाजू मांडताना निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी फक्त काही वेळ शिल्लक आहे, त्यामुळे आता पोटनिवडणूक घेण्याचा काही फायदा नाही, असे म्हटले होते.

निवडणूक आयोगाच्या या भूमिकेवर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खता आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी आयोगाने दिलेला युक्तिवाद अयोग्य आणि विचित्र आहे. कोणत्याही भागातील लोकांना जास्त काळ प्रतिनिधित्वाशिवाय ठेवता येत नाही अशी टिप्पणी न्यायालयाने केली. तसेच, निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निवडणुका घेण्याच्या दिशेने पावले उचलली पाहिजेत असे आदेश दिले होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात निवडणूक आयोगाने सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान पुणे लोकसभा जागेसाठी तातडीने पोटनिवडणूक घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.