आयात केलेला परदेशी कांदा मुंबईत दाखल, किमतीत घसरण
आयात केलेला परदेशी कांदा मुंबईत दाखल होत आहे तसेच नवीन लाल कांद्याची आवकही वाढली आहे.
नाशिक : आयात केलेला परदेशी कांदा (foreign onion) मुंबईत दाखल होत आहे तसेच नवीन लाल कांद्याची आवकही वाढली आहे. त्यामुळे लासलगाव बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत आज मंगळवारी कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण (onion prices) झाली आहे. सर्वसाधारण बाजारभावात प्रतिक्विंटल मागे 1200 रुपयांची तर कमाल बाजारभावात 891 रुपयांची घसरण झाली आहे. अचानक एका दिवसात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Imported foreign onion arrives in Mumbai, prices fall)
कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. परदेशी कांदा मुंबईत आला आहे, तसेच देशांतर्गत बाजार समित्यांमध्येदेखील लाल कांद्याची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे.
लासलगाव बाजार समितीत 450 वाहनातून 5100 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्याला प्रतिक्विंटल कमाल 5300 रुपये, सर्वसाधारण 4100 रुपये तर किमान 1500 रुपये इतका बाजारभाव मिळाला, त्यामुळे सोमवारच्या तुलनेत आज मंगळवारी सर्वसाधारण बाजारभावात 1200 रुपयांची, तसेच कमाल बाजारभावात 891 रुपयांची प्रतिक्विंटलमागे घसरण झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.
सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने कुटुंब कसे चालवावे आणि झालेला खर्च कसा काढावा, असा प्रश्न आता कांदा उत्पादकांसमोर उभा राहिला आहे. वेगवेगळ्या निर्बंधांमुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कांद्याला बाजारभाव मिळणे गरजेचे असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहेत.
संबंधित बातम्या
Breaking|कांदा उत्पादक बाजार समित्यांमध्ये कांदा घेऊन लिलावासाठी दाखल, नाशिक बाजार समितीतून LIVE
नाशिकमध्ये शेतकरी हवालदिल; चोरट्यांकडून जाळ्या तोडून 10 ते 15 क्विंटल कांदा लंपास
कांदा उत्पादक व्यापाऱ्यांची साठा मर्यादा चारपट वाढवा, चंद्रकांत पाटलांची केंद्राकडे मागणी
(Imported foreign onion arrives in Mumbai, prices fall)