महिनाभरात परिस्थिती अनकंट्रोल होईल, 28 दिवसांचा लॉकडाऊन करा, माजी खासदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आता महाराष्ट्रात 28 दिवसाचा लॉकडाऊन करा, असं पत्र माजी खासदाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.

महिनाभरात परिस्थिती अनकंट्रोल होईल, 28 दिवसांचा लॉकडाऊन करा, माजी खासदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 11:30 AM

मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक (Mahrashtra corona) होत आहे. दररोज जवळपास 50 हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra weekend lockdown) आणि कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र आता महाराष्ट्रात 28 दिवसाचा लॉकडाऊन करा, असं पत्र माजी खासदाराने लिहिलं आहे. माजी खासदार आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड (Ex MLC Haribhau Rathod) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. (Impose 28 days lockdown in Maharashtra Ex MLC Haribhau Rathod writes to CM Uddhav Thackeray)

वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे निर्बंध आहेत, त्यामुळे गोंधळाची स्थिती आहे. महिनाभर असंच सुरु राहिलं तर नियंत्रणाबाहेर जाईल आणि आरोग्य यंत्रणा फेल झाल्याचं दिसेल. परिणामी महाराष्ट्राची संपूर्ण देशात बदनामी होईल, असं हरिभाऊ राठोड यांनी पत्रात म्हटलं आहे.

हरिभाऊ राठोड यांचं पत्र जसंच्या तसं

मा. ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री म.रा. मंत्रालय मुंबई

विषय:- २८ दिवसाचा लॉगडाऊन लावण्याबाबत…

महोदय,

राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी लॉक डाऊन, मिनी लॉकडाउन, वेगवेगळी बंधने, लावली जात आहेत. सर्व जिल्ह्यात एक सारखी परिस्थिती नाही ,ही संपूर्णतः गोंधळाची स्थिती आहे. राज्यात देशातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहे, आणि दिवसागणिक हा आकडा वाढत चालला आहे. कदाचित एक महिन्यानंतर हे अनकंट्रोल होईल.यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे फेल झालेली दिसेल.अशा परिस्थितीमध्ये, राज्याची नाहक बदनामी होईल, आणि जनतेच्या स्वाथासाठी सुद्धा हे हानिकारक राहील. माझी आपणास विनंती आहे, कुणाचीही तमा न बाळगता, कडक धोरण स्वीकारावे लागेन, कोरोनाची साखळी तोडावी लागेन, तरच आपण कोरोनावर विजय मिळवू शकतो. असा माझा ठाम विश्वास आहे.

२८ दिवसाचा लॉगडाऊन जाहीर करावा, हे जाहीर करतांना ५ दिवस आधी तो जाहीर करावा, सर्व पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, अत्यावश्यक सेवा यांना सतर्क ठेवावे. या काळामध्ये चीट पाखरूही बाहेर दिसू नये, असे कडक धोरण अवलंबविण्यात यावे.

लॉगडाऊन ची घोषणा करतांना काही गटांना आर्थिक मदतीची घोषणा व्हावी, उदा. शेतमजूर, इमारत बांधकाम मजूर , ऊसतोड कामगार, विटभट्टी मजूर,घरेलू कामगार आणि बारा बलुतेदार यांच्यासाठी प्रत्येक कमीत कमी ५ हजार रु.ची घोषणा करावी.

धन्यवाद..

आपला हरिभाऊ राठोड माजी वि.प.स.

VIDEO : 28 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावा

संबंधित बातम्या 

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागणार?

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्र्यांनी बाह्या सरसावल्या, फडणवीस, राज ठाकरेंसह सर्वपक्षीयांना पुन्हा बोलावलं, कडक लॉकडाऊनची शक्यता

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनचं काऊंटडाऊन सुरू; वाचा, संपूर्ण नियमावली काय?

Vijay Wadettiwar EXCLUSIVE | राज्यात 3 आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनची गरज, विजय वडेट्टीवारांचे संकेत

(Impose 28 days lockdown in Maharashtra Ex MLC Haribhau Rathod writes to CM Uddhav Thackeray)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.