नको तो उल्लेख… नवनीत राणा यांच्याबद्दल बोलताना इम्तियाज जलील यांची जीभ घसरली

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक प्रचार आज संपत आहे. पण त्यापूर्वीच आरोपप्रत्यारोपांच्या तोफा धडाडत आहे. भाजप नेत्या नवनीत राणा आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्यातील कलगीतुरा प्रचंड रंगला आहे. दोघांनीही एकमेकांवर हल्ला करण्यास सुरुवात केलेली असतानाच आता या वादात इम्तियाज जलील यांनीही उडी घेतली आहे.

नको तो उल्लेख... नवनीत राणा यांच्याबद्दल बोलताना इम्तियाज जलील यांची जीभ घसरली
navneet ranaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 11, 2024 | 4:28 PM

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्यातील कलगीतुरा अधिकच वाढला आहे. आता या कलगीतुऱ्यात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी उडी घेतली आहे. जलील यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्ला केला. हा हल्ला करताना त्यांची जीभ घसरली. तुम्ही या चिल्लर लोकांना एवढं महत्त्व का देता? माझ्या नजरेची अतिशय चीप दर्जाची महिला आहे. प्रसिद्धीसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकते. पब्लिसिटीसाठी मंदिरात न जाता उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचायची म्हणत होती. 10 मिनिटे कॅमेरासमोर तुला दाखवतो असं म्हणाल्यास ती 10 मिनिटे एकटी नाचेल. तिला इथं प्रचाराला बोलावलं. भाजपाला कोणीतरी भूंकणारं हवं आहे. अमरावतीवरून हे पार्सल आणलं आहे आता त्यांची मेहफिल सजेल, असा हल्लाच इम्तियाज जलील यांनी चढवला.

तुम्ही दारूचे दुकान उघडले म्हणून दारूच्या बाटल्या दाखवल्या. निवडणुकीचं चिन्ह दारूची बॉटल ठेवायला पाहिजे होती. प्रचाराला दोनशे दोनशे रुपयांमध्ये आले होते हे मलाही माहीत आहे. बिचारे दोनशे रुपये घेऊन प्रचाराला येणाऱ्या लोकांना दोनशे रुपयात घोषणा द्यायची म्हणून आणले होते. मात्र त्यांना हे माहीत नव्हते की दोनशे रुपयात दांडेपण खावे लागतील, असा टोला इम्तियाज जलील यांनी विरोधकांना लगावला.

उद्या नक्कीच वाजवणार

शिवसेना म्हणते मोदीला हरवायचं आहे. आम्हाला इथ जिंकायचं. असं कसं चालेल? मी निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणार आहे. तळवे चाटण्यामुळे तुमचे अस्तित्व संपले. एकेकाळी म्हणायचे औरंगाबाद हा शिवसेनेचा गड आहे. पण आपण हा गड उचलून टाकला. 2024 ला देशातील सर्वात मोठा जश्न आम्ही करणार.10 असे राज्य आहेत जिथं भाजपने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नाही.उद्या तुमची नक्कीच वाजवणार, असा इशाराच त्यांनी दिला.

याद राखा मी…

असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांचा छोटा भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांची स्तुती केली होती. माझा छोटा भाऊ हा तोफ आहे, असं ओवैसी म्हणाले होते. त्यावर नवनीत राणा यांनी पलटवार केला होता. अशा तोफा आम्ही घराच्या बाहेर सजावटीसाठी ठेवतो, असं प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी दिलं होतं. मोठा म्हणतोय छोटा खतरनाक आहे. पण आम्ही असे खतरनाक घरात पाळतो. याद राखा मी एका सैनिकाची लेक आहे, असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला होता.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.