“विरोधी पक्ष म्हणतोय पैसा आणणार कुठून?”; उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत गोळाबेरजेसह विरोधकांना हिशोब सांगितला
पैसा महत्वाचा नसतो तर इच्छाशक्ती महत्वाची असते असा टोला त्यांनी विरोधकांनी लगावला आहे. समृद्धी महामार्गवेळी विरोधक मला म्हणत होते काय वेडा माणूस आहे का, तर इथे छोटे रस्ते होतं नाहीत आणि समृद्धी महामार्ग कुठून करणार असा सवालही त्यांनी केला होता
कर्जत : राज्याचे उपमुख्यमंत्री आज कर्जत दौऱ्यावर असताना केंद्र सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारने राज्याातील शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजनांची यादीच वाचून दाखवली. यावेळी भाजपचे आमदार राम शिंदे यांचे कौतूक करत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आपल्या योजनांद्वारे उत्तर दिले. यावेळी राम शिंदे यांचे कौतूक करताना ते म्हणाले की, रामभाऊ तुमचे कामच वेगळे आहे. इतर पक्षाच्या कार्यक्रमामध्ये जेवढे लोक समोर बसलेले असतात तेवढी लोकं तुम्ही व्यासपीठावर बसवली आहेत.तर मी पाठीमागे वळून बोललो तरी इकडे पण एक सभा होईल असं म्हणत त्यांनी त्यांचा गौरवही केला आहे.
येथील प्रकल्पांची माहिती देताना ते म्हणाले की, हे सर्व प्रकल्पांची सुरुवात ही राम शिंदे पालकमंत्री असताना येथील कामांना सुरुवात झाली होती. मात्र दुसरे सरकार आले तरी आपल्याच सरकारच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले असल्याचा टोला त्यांनी विरोधकांनी लगावला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे अडचण आल्यानंतर त्यांना 7 हजार कोटी रुपये दिले आहेत.
तर मागील सरकारने वेळेवर कर्ज भरतील त्यांना अनुदान देऊ असेल सांगितले होते, मात्र शेतकऱ्यांना दोन वेळा अनुदान मिळाले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचा दाखला देताना ते म्हणाले की, आपले सरकार आल्यानंतर तात्काळ पैसे दिले आहेत. त्यामुळे आणखी अडीच लाख शेतकऱ्यांना पैसे देणार असल्याचे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
आमच्या सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना आणली आणि 1 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी 1 रुपयांचा हप्ता केला आणि तोही सरकार भरणार आहे. मात्र शेतकऱ्यांना कोणताही हप्ता भरावा लागणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
कृषीपंपाच्या वीज पुरवठ्याविषयी बोलताना ते म्हणाले की, रात्रीच्या विजेमूळे शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांना अडीअडचणींचा सामना करावा लागतो म्हणून त्यासाठी आम्ही आता सोलर फिडर दिले आहे.
त्यामुळेच राळेगण सिद्धीमध्ये आपण मागील वेळी आपण सोलर फिडर बसवले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.त्यामुळे आता आता आगामी काळात आम्ही हा कार्यक्रम राबवणार असून त्यासाठी सरकारी जमीन फिडरसाठी देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच सरकारी जमीन नसेल तर आम्ही शेतकऱ्यांकडून आम्ही भाड्याने घेणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना वार्षिक 75 हजार भाडे देणार आणि प्रतिवर्षी 3 टक्के भाडेवाड देण्याची घोषणाही त्यांनी आज केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात 100 टक्के सोलर फिडर करा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले आहे.
ज्या प्रमाणे शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने वेगवेगळ्या योजना आणल्या त्याच प्रमाणे धनगर समाजासाठी बिनव्याजी 10 हजार रुपयांचे भांडवल योजना लागू केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात वेगवेगळ्या योजना आखण्यात आल्या तरीही विरोधी पक्ष म्हणतोय पैसा आणणार कोठून? मात्र पैसा आहे.
जर आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी पैसा वापरला तर विकासासाठी पैसा कुठून आणणार असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
तर पैसा महत्वाचा नसतो तर इच्छाशक्ती महत्वाची असते असा टोला त्यांनी विरोधकांनी लगावला आहे. समृद्धी महामार्गवेळी विरोधक मला म्हणत होते काय वेडा माणूस आहे का, तर इथे छोटे रस्ते होतं नाहीत आणि समृद्धी महामार्ग कुठून करणार असा सवालही त्यांनी केला होता, मात्र आमच्या काळात विरोधकांच्या प्रश्नांना आम्ही उत्तर दिले आहे, कारण मी ते केले कारण इच्छा शक्ती हवी त्यामुळे ते शक्य झाले अशा स्पष्ट शब्दात त्यांना त्यांना उत्तर दिले आहे.