संघाचं फडकं देशाचं निशाण नाही होऊ शकत, उद्धव ठाकरे कडाडले
परवा मोदींनी निवडणूकीचा अर्ज भरला. त्यावेळी ते म्हणाले की 2014 मध्ये गंगा माँ ने बुलाया था. आता गंगा माँने मला दत्तक घेतलं. त्या गंगेत कोरोनाच्या काळात प्रेते तरंगली. तेव्हा गंगेचे अश्रू का पुसले नाहीत ? अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महामुलाखतीत त्यांनी टीव्ही 9 मराठी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्या प्रश्नांना मोकळेपणी उत्तरे दिली. ते पुढे म्हणाले की शिवसेनेचे मिंधे हा या निवडणुकीत विषय होऊ शकत नाही. त्यांची योग्यता नाही. ते फक्त कठपुतली आहेत. आम्ही भाजपसोबतच होतो. 25 ते 30 वर्षे भाजपसोबत होतोच ना? कसे वागले ते. तुम्ही अडीच वर्ष भोगलंत ना सगळं. म्हणून मला कठपुतळ्यांबद्दल बोलायचं नाही असा वार उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. मोदीजी यांनी माझ्या तब्येतीची काळजी फोनवरुन घेतल्याचे सांगत आहेत. त्यावेळेचे फोन रेकॉर्ड नाही. त्यांनी कितीवेळा चौकशी केली ते सांगायला. त्यावेळी माझे स्थिती ठिक नव्हती. मोदी जेव्हा फोन करीत होते तेव्हा तुमचे लोकं माझ्याविरोधात कारस्थानं का करत होती ? असा सवाल ठाकरे यांनी मुलाखतीत केला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘ त्यावेळी माझी परिस्थिती अत्यंत वाईट होती. खांद्यापासून माझी हालचाल बंद झाली होती. त्यावेळी मोदी माझी चौकशी करत असतील तर त्यांना माहीत होते. त्यामुळे तुमचे लोकं माझ्याविरोधात त्यावेळी गद्दारीची कारस्थानं का करत होती? हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम? त्यांचेच लोक म्हणत आहेत की, रात्री हुडी घालून गॉगल घालून जायचे. ते काशासाठी जायचे. मला त्यात जायचं नाही. लोकसभेत तुम्ही 10 वर्ष फसवली. तुम्हाला पाच वर्ष काय द्यायची ?. अग्निवीर… त्यांनी चार वर्षे काम नाही चांगलं केलं तर घरी जाणार. तुम्ही दहा वर्षात काही केलं नाही. तुम्हाला का एक्स्टेंशन द्यायचं? असा सवालच ठाकरे यांनी यावेळी केला.
परवा मोदींनी वाराणसीतून निवडणूकीचा अर्ज भरला. त्यावेळी त्यांची मुलाखत घेतली. 2014 मध्ये गंगा माँ ने बुलाया था. आता गंगा माँने मला दत्तक घेतलं, असं मोदी म्हणाला. त्या गंगेत कोरोनाच्या काळात प्रेते तरंगली. तेव्हा गंगेचे अश्रू का पुसले नाहीत ? का तिचे अश्रू पाहिले नाही. काही तरी बोलत आहे. गंगेच्या साफ सफाईचं काय झालं.? काही तरी बोलत आहेत. का तुम्हाला दत्तक घेतलं जात आहे?
देशाचा तिरंगा हा तसाच राहणार
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेबांवरचा त्यांचा राग आहे. दोन कारणासाठी आहे. एक तर महाराष्ट्रात जन्मलेला माणूस आणि दलित कुटुंबात जन्मलेला विद्वान माणूस त्यांना खटकत आहे. त्यांच्याबद्दलचा द्वेष आहे. म्हणूनच ते संविधान बदलत आहेत. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कशी मानायची? म्हणून त्यांना घटना बदलायची आहे असेही ठाकरे यांनी सांगितले. आणि नड्डा बोलले की देशात एकच पक्ष राहील. पूर्वी एक विधान, एक निशाण एक प्रधान म्हणाले. आम्हाला वाटलं होतं की तिरंग्यासाठी करत आहेत. पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकत नव्हता. यांचं फडकं फडकत होतं. ते फडकं देशाचं निशान नाही होऊ शकत. आमच्या देशाचा तिरंगा हा तसाच राहणार. संविधान तसंच राहणार. प्रधान लोकांनी निवडून दिलेलाच राहणार. पुतीन सारखा निवडून येणार नाही अशा भाषेत उद्धव ठाकरे यांनी यावेळी संघावर टीका केली.
त्या दिवशी भाजप अर्धा फुटेल…
मला चिंता आहे की, 4 जूनला सरकार जातंय. त्या दिवशी अर्धा भाजप तिथेच फुटेल. परत पंतप्रधानपद गेलेलं असेल. त्यांनी 75 वर्षांची अट टाकलेली आहे. दोन वर्षांनी मोदी रिटायर होणार. मग भाजपचं काय होईल.? एक जमाना असा होता, की अटलबिहारींचा पराभव झाला होता. दोनच खासदार भाजपचे होते. पुन्हा 302 वरून दोन झाले तर काय करतील भाजपवाले? यांना कुठे विलीन व्हायला पक्षही राहणार नाही. यांना कोणीही घेणार नाही. हे दगाबाज आहेत. घरात घुसले तर आग लावून पळतात बाहेर. आमचं सोडा. आमच्या ताकदीने आम्ही आहोत. मोदी आणि भाजपसमोर कोणता प्रश्न असेल की भाजपचं काय होईल. कारण मोदींचा चेहराही राहिला नाही. सत्ता गेल्यावर त्यांच्याकडे आलेले उंदीर कोणत्या दारात जाणार. कारण आता दारंही राहिली नाहीत. पुन्हा हे गद्दार पक्ष काढणार का….