Aurangabad : औरंगाबादमध्ये रस्त्यावर एक किलोमीटरपर्यंत निरोधचा सडा
या निरोधवर कोणतेही लेबल नसल्याने हा निरोधचा साठा नेमक्या कोणत्या कंपनीचा हेही लोकांना कळत नव्हते. शिवाय या मार्गावर हे निरोध मोठ्या प्रमाणावर कसे व कोठून आले, याचे नेमके कारणही समजू शकले नाही.
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील खंडाळा ते परसोडा रस्त्यावरील विनायक सहकारी साखर कारखान्याच्या पुढील चौफुलीवर काल सकाळच्या सुमारास रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना सडा टाकल्यागत निरोध (Condom) दिसून आले. सुमारे दहा हजारांहून अधिक संख्या असलेले हे निरोध रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले आढळून आल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे लोकही चक्रावून गेले होते. सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत हे निरोध रस्त्यावर सडा टाकावा, तसे पडलेले होते. या निरोधवर कोणतेही लेबल नसल्याने हा निरोधचा साठा (Stock) नेमक्या कोणत्या कंपनीचा हेही लोकांना कळत नव्हते. शिवाय या मार्गावर हे निरोध मोठ्या प्रमाणावर कसे व कोठून आले, याचे नेमके कारणही समजू शकले नाही. (In Aurangabad condoms were found up to one kilometer on the road in Vaijaipur taluka)
आरोग्य विभागाच्या वाहनातून हे निरोध पडले असण्याची शक्यता
दरम्यान, हे निरोध मुद्दाम इथे फेकले गेले की चुकून रस्त्यावर पडले, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे.असे असले तरी आरोग्य विभागाच्या एखाद्या वाहनातून हे निरोध पडले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनधारकाना रस्त्यावर विखुरलेले हे निरोध बघून धक्काच बसला. महत्वाचे म्हणजे, सायंकाळपर्यंत आरोग्य विभागासह कुणीच याबाबत दखल घेतली नव्हती. दुपारच्या सुमारास निरोध उन्हात तापल्याने उग्र दुर्गंधी सुटली होती. रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलांची हे चित्र बघून तर कुचंबणा झाली होती. त्यामुळे महिलांना शरमेने मान खाली घालून रस्त्यावरुन जाण्याची वेळ आली. ज्या ठिकाणी हे निरोध पडलेले होते, तेथून बोरसरचे प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ 3 किलोमीटर अंतरावर आहे. असे असतानाही आरोग्य विभागाचे अधिकारी किंवा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यापैकी कुणीही याची दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. (In Aurangabad condoms were found up to one kilometer on the road in Vaijaipur taluka)
इतर बातम्या
Pune, IPL2022 : विराट कोहली, रोहित शर्माला भेटण्याचा मोह महागात, क्रिकेटप्रेमीवर गुन्हा दाखल