सत्तेच्या चाव्या सावित्रीच्या लेकींच्या हाती, परंडा तालुक्यातील चिंचपूरचा नवा आदर्श
सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष पडलेले असताना देखील गावाने महीला सबलीकरणाचा विचार सत्यात उतरवला आहे.
उस्मानाबाद : परांडा तालुक्यातील चिंचपूर (बु) या ग्रामपंचायतच्या सत्तेच्या चाव्या सावित्रीच्या लेकीच्या हाती आल्या आहेत. या ग्रामपंचायतीचा कारभार आता महिला पाहणार आहेत. परंडा तालुक्यातील चिंचपूर (बु) येथील ग्रामपंचायतवर 70 वर्षाच्या इतिहासात प्रथमच भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. भाजपने ही सत्ता 7- 4 च्या फरकाने खेचून आणली आणि कारभार महिल्यांच्या हाती सुपूर्द केला आहे.(the management of Gram Panchayat is in the hands of women)
चिंचपूरने आदर्श निर्माण केला
सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष पडलेले असताना देखील गावाने महीला सबलीकरणाचा विचार सत्यात उतरवला आहे. त्या दृष्टीने भाजपच्या जनशक्ती परिवर्तन पॅनलच्या प्रमुख परंडा पंचायत समिती सदस्या अश्विनी सतिश देवकर यांनी ग्रामपंचायतच्या सत्तेच्या चाव्या सावित्रीच्या लेकीच्या हाती देऊन नारी शक्तीचा मोठा सन्मान केला आहे. सर्व सामन्य कुटुंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या पाच महिला आता गावाचा कारभार चालवणार आहेत. एकीकडे सत्तासंघर्षाची रस्सीखेच सुरु असताना चिंचपूर हे गाव आदर्श निर्माण करुन देत आहे.
सरपंचपदी प्रियंका पोपट शिंदे तर उपसरपंचपदी द्वारकाबाई गोवर्धन सावंत यांची वर्णी लागली आहे. तर शितल दत्तात्रय सुतार, भाग्यश्री भारत देवकर, विद्या प्रकाश सावंत, महेश भागवत देवकर, भगवत कोंडीबा शिंदे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
पुरुषांनी सत्तेच्या चाव्या महिलांकडे सोपवल्या
कायद्याने महिलांना 50%आरक्षण दिले आहे. पण आज चिंचपूर (बु) ग्रामपंचायतीत 100% महिलाराज पाहायला मिळत आहे. फुलांच्या पायघड्या घालून विजयी महिलांचे गावकऱ्यांनी स्वागत केलं. महिला सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार केला. इतकच नाही तर भाजपचे सर्वसाधारण पुरुष जागेवर निवडुन आलेले महेश देवकर आणि भागवत शिंदे यांनी पदाची अपेक्षा न करता महिलांच्या हाती सत्ता देऊन आदर्श निर्माण केला आहे.
आमदार सुजितसिंह ठाकूर आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील, भाजयुमो तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सत्ता भाजपाने 7- 4 च्या फरकाने खेचून आणली. सरपंच निवडीनंतर यानंतर ग्रामस्थांच्या वतीने उमेदवारांचा नागरी सत्कार करण्यात आला. भाजप जिल्हाअध्यक्ष नितीन काळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी सरपंच, उपसरपंच आणि विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
संबंधित बातम्या :
चंद्रपूरमधील चुनाळा ग्रामपंचायतीत सरपंच पदाचा पेच
Women’s Day Special : बारामतीत एकदिवसीय महिला ग्रामपंचायत, तर अमरावतीत पोलीस स्टेशनचा ताबा महिला पोलिसांकडे
the management of Gram Panchayat is in the hands of women