मोठी बातमी : जळगावमध्ये दहा बालकांना विषबाधा, एकाची प्रकृती गंभीर

जळगावमधील गांधली गावातील दहा मुलांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आलेत. मात्र, यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांची सर्व टीम येथे दाखल झाली आहे. मुलांना वाचविण्यासाठी त्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मोठी बातमी : जळगावमध्ये दहा बालकांना विषबाधा, एकाची प्रकृती गंभीर
amalner rural hospital Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 10:47 PM

जळगाव : 5 ऑक्टोबर 2023 | नांदेड येथील ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या घटनेला ७२ तास उलटत नाही तोच जळगावमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार घडलाय. जळगावातील अमळनेर तालुक्यातील गांधली येथील दहा बालकांना विषबाधा झाली आहे. दहा बालकांना संडास आणि उलट्यांचा त्रास होत आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. अमळनेरमधील ग्रामीण रुग्णालयात सर्व बालकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रांजली पाटील, डॉ. प्रकाश ताडे यांनी या मुलांवर तातडीने उपचार सुरू केले. प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना ही घटना कळताच त्यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तसेच, बालकांच्या योग्य आरोग्य सेवा देण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी देखील रुग्णालयात जाऊन बालकांची चौकशी केली.

जळगावातील अमळनेर तालुक्यात गांधली गावात ही घटना घडली. ही सर्व मुले दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका मंदिराच्या प्रांगणात खेळत होती. यावेळी एका मुलीने एरंडीच्या बियांसारखा पदार्थ सोबत आणला होता. खेळणाऱ्या मुलांना भूक लागली म्हणून त्यांनी त्या बिया खाल्ल्या.

काहींनी एक दोन बिया तर काहींनी जास्त बिया खाल्या. त्यामुळे सुमारे साडे तीन वाजताच्या सुमारास सर्व मुलांना अचानक संडास आणि उलट्या होऊ लागल्या. पालकांनी घाबरून त्यांना घेऊन तातडीने रुग्णालय गाठले. सुरुवातीला दोन, नंतर पाच, नंतर तीन अशी एकापाठोपाठ दहा बालके उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आली.

गांधली येथील जोया सुलतान पिंजारी (वय ९), अयान सुलतान पिंजारी (वय ११), अर्जुन सुरेश भिल (वय १०), करण सोमा भिल (वय ९), अक्षरा सुनील भिल (वय १०), नर्गिस सुलतान पिंजारी (वय ३), गोकुळ प्रकाश भिल (वय १२), अश्विनी सुरेश भिल (वय ११), संगीता नारायण संदानशीव (वय १०), किरण अविनाश भिल (वय ११) अशी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बालकांची नावे आहेत. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांपैकी एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.