Latur Corona: कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, आता बंद कोविड केअर सेंटरचीही दारे खुलणार

1 जानेवारीपूर्वी जेवढे रुग्ण उपचार घेत होते तेवढ्याच रुग्णांची आता दिवसाकाठी भर पडत आहे. गेल्या दोन दिवसांतील आकडेवारी तर जिल्हा प्रशासनाला थक्क करणारी आहे. बुधवारी 51 तर सलग दुसऱ्या दिवशी 68 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे लातूर जिल्हा तिसऱ्या लाटेच्या उंबठ्यावर य़ेऊन ठेपला असल्याने आता योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

Latur Corona: कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, आता बंद कोविड केअर सेंटरचीही दारे खुलणार
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 12:04 PM

लातूर : 1 जानेवारीपूर्वी जेवढे रुग्ण उपचार घेत होते तेवढ्याच रुग्णांची आता दिवसाकाठी भर पडत आहे. गेल्या दोन दिवसांतील आकडेवारी तर (Latur) जिल्हा प्रशासनाला थक्क करणारी आहे. बुधवारी 51 तर सलग दुसऱ्या दिवशी 68 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे लातूर जिल्हा तिसऱ्या लाटेच्या उंबठ्यावर य़ेऊन ठेपला असल्याने आता योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. गुरुवारी जिल्हाभरातील 1 हजार 993 जणांची टेस्ट करण्यात आली होती तर पैकी 68 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. उपचार घेत असलेल्या 6 जणांची प्रकृती ही ठणठणीत झाल्याने त्यांची रुग्णालयातून सुटी करण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे निर्देश

रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे जिल्हाभरातील सेंटर हे बंद करण्यात आले होते. केवळ शहरातील पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन हे एकमेव कोविड केअर सेंटर सुरु होते. मात्र, 1 जानेवारीपासून जिल्हाभरात रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अन्य चार ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत. तर यापूर्वी ज्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु होते त्याची काय अवस्था आहे याचा आढावा आता जिल्हा प्रशासनाकडून घेतला जात आहे.

1 टक्क्यावरील पॉझिटिव्ह रेट आता 3.5 टक्क्यांवर

1 जानेवारी पर्यंत सर्वकाही अलबेल सुरु होते. मात्र, सध्या जी रुग्णसंख्या वाढत आहे ती चिंताजनक आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट केवळ 1 टक्यावर गेला होता. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करतोय अशी स्थिती असताना गेल्या 5 दिवसांमध्ये चित्रच बदलले आहे. सध्या पॉझिटिव्ह रेट 3.5 वर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे तिसऱ्या संभाव्य लाटेच्या अनुशंगानेच आता जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन हाच तेवढा पर्याय असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एल.एस.देशमुख यांनी सांगितले आहे.

दिवसाला 20 रुग्णांची पडतेय भर

सध्या लातूर जिल्ह्यामध्ये 187 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत दिवसाला जिल्ह्यात 8 ते 10 रुग्णांची भर पडत होती पण आता 20 ने वाढ होत आहे. असे असतानाही बाजारपेठेत वाढती गर्दी आणि नियमांचे उल्लंघन हे लातूरकरांची चिंता वाढवणारेच विषय आहेत. जिल्हा प्रशासनाकडून केवळ आवाहन केले जात आहे पण प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठीचे प्रयत्न दिसून येत नाहीत. वाढत्या रुगणसंख्येमुळे चाकूर, 12 नं पाटी, निलंगा दापका येथे कोविड केअक सेंटर सुरु करण्याच्या हलचाली सुरु झाल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Nashik Crime| 16 कृषी अधिकाऱ्यांचा 147 शेतकऱ्यांना गंडा; शासनालाही 51 कोटींचा चुना, नेमका घोटाळा काय?

Nashik Corona| नाशिकमधील शाळा सोमवारपासून बंद; कुठले वर्ग राहणार सुरू?

Corona Updates: कोरोना हरतोय? विषाणूची तीव्रता कमी, औरंगाबादमधील कुठे किती जण उपचार घेतायत?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.