Latur: दोन वर्षात 9 लाख 50 हजार जणांच्या कोरोना चाचण्या अन् 2 हजार 461 रुग्णांचा मृत्यू
जिह्यात कोरोनाची सुरवात झाली होती ती, निलंगा तालुक्यापासून. आता पर्यंत 10 तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा टप्प्याटप्प्याने सुरु झाला होता. गरजेनुसार कोरोना चाचण्या आणि कोविड केअर सेंटरची उभारणीही जिल्हा प्रशासनाने केली होती. आतापर्यंतचा कोरोनाचा आढावा घेत असताना जिल्ह्यातील 9 लाख 52 हजार 544 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे
लातूर : जिह्यात कोरोनाची सुरवात झाली होती ती, निलंगा तालुक्यापासून. आता पर्यंत 10 तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा टप्प्याटप्प्याने सुरु झाला होता. गरजेनुसार कोरोना चाचण्या आणि (Covid Center) कोविड केअर सेंटरची उभारणीही जिल्हा प्रशासनाने केली होती. आतापर्यंतचा कोरोनाचा आढावा घेत असताना (Latur District) लातूर जिल्ह्यातील 9 लाख 52 हजार 544 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे तर 1 लाख 2 हजार 977 जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे तर तब्बल 2 हजार 461 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद (District Administration) प्रशासन दरबारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक होते. आता पुन्हा 1 जानेवारीपासून रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून जे कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते ते पुन्हा सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी मध्यंतरी आरोग्य विभागाला दिले होते.
दिवसाकाठी 400 रुग्णांची भर
जानेवारी महिन्यापूर्वी अनेक तालुके हे कोरोनामुक्त झाले होते. पण 1 जानेवारीनंतर पुन्हा रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली होती. मध्यंतरी तर मराठवाड्यात औरंगाबाद नंतर लातूर जिल्ह्यातच अधिकचे रुग्ण होते. सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना टेस्ट केली जात असून दिवसाकाठी 400 ते 450 रुग्णांची भर पडत आहे. फेब्रुवारी 2020 पासून जिल्ह्यात कोरोना टेस्टला सुरवात करण्यात आली होता.
1 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात
लातूर जिल्ह्याची लोकसंख्या ही 25 लाखाच्या घरात आहे तर लातूर शहराची 5 लाखापर्यंत आहे. त्यानुसार आतापर्यंत 9 लाखाहून अधिक नागरिकांच्या ह्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 15 हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असली तरी कोरोनाची लक्षणे ही सौम्य आहेत. मात्र, बाधित होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
दररोज 10 हजारावर चाचण्या
1 महिन्यापासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. ही लक्षणे सौम्य असली तरी पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी अधिक असल्याने जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 1 जानेवारीपासून चढत्या क्रमाणे सुरु झालेला आलेख आता कुठे कमी होताना दिसत आहे. असे असले तरी खबरदारी म्हणून दिवासाला जिल्ह्यात 10 हजारवर टेस्ट ह्या केल्या जात आहेत. शिवाय दिवसेंदिवस रुग्णसंख्या घटतही आहे.
संबंधित बातम्या :
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी उदय सामंत कोर्टात जाणार?; कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून घेणार निर्णय