loksabha Election 2024 | महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी कोण ठरणार सरस? सर्व्हेमधून समोर आले धक्कादायक वास्तव
सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला 39 तर महाविकास आघाडीला 9 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर India today च्या सर्व्हेमध्ये महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 26 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेलाय.
मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकांबाबत आज दोन संस्थांचे सर्व्हे समोर आले. दोन्ही सर्व्हे दोन वेगवेगळ्या संस्थांनी केलेत. मात्र, यापैकी एका सर्व्हेत महायुतीला धक्का बसण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. तर दुसऱ्या सर्व्हेत महाविकास आघाडीला धोका दिसतोय. जसजशा निवडणूका जवळ येतायेत तसतसे सर्व्हे आणि त्यांचे आकडे चर्चेत आलेत. times now च्या सर्वेत महाराष्ट्रात लोकसभेला महायुतीवरच ठरण्याचं भाकीत वर्तवलं गेलं. मात्र, India today C voter च्या सर्व्हेमध्ये भाजपाला धक्का बसणार असून महाविकास आघाडीचा फायदा होताना दिसतोय.
भाजप नेते मागच्या निवडणुकीपेक्षाही जास्त खासदार महाराष्ट्र मोदीजींना देईल असं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे असे सांगत आहेत. तर, विरोधकांनी सुप्त वातावरण आहे. मोदीजींच्या बाजूने नाही. निवडणूक जवळ येईल तसे आकडे वाढत जातील. कारण मोदीजींचं वादळ महाराष्ट्रामध्ये येणं सुरू झालं आहे असे म्हटलंय.
खासदार संजय राऊत यांनी सर्व्हे वगैरे काय घेऊन बसलाय? EVM आणि ओपिनिअन पोल याच्यावर विश्वास ठेऊ नका. हा एक सगळ्यात मोठा आहे देशातला फ्रौड आहे. आधी ओपिनिअन पोल येतात आणि त्यानंतर त्या पद्धतीनं ईव्हीएम सेट केले जातात. हे आता स्पष्ट झालेलं आहे अशी टीका केलीय.
गेल्या वर्षभरापासून जवळपास दर दीड महिन्यांनी एक सर्व्हे समोर येत आहे. त्यात कधी महाविकास आघाडीला धक्का आहे तर कधी महायुतीला. मात्र, हे सर्व त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार असल्याचं सांगितलं जातंय. गेल्या नऊ दहा महिन्यांमध्ये कोणकोणते सर्व्हे आले आणि त्यामध्ये काय काय आकडे होते?
30 जुलै 2023 ला India TV, CNX चा सर्व्हे आला. ज्यामध्ये महायुतीला 24 आणि महाविकास आघाडीलाही 24 जागांचा अंदाज वर्तवला गेलाय. 17 ऑगस्ट 2023 ला times now ETG चा survey आला. ज्यात महायुतीला 28 ते 32 आणि महाविकास आघाडीला 15 ते 19 जागांचा अंदाज बांधण्यात आला होता.
7 ऑक्टोबरला India TV आणि CNX चा सर्व्हे झाला. यात महायुतीला 28 तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली. आज आलेल्या Times Now च्या सर्व्हेमध्ये महायुतीला 39 तर महाविकास आघाडीला 9 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सर्व्हे वेगवेगळ्या संस्थांनी केलेले असले तरी शेवटच्या दोन्ही सर्व्हेमधलं अंतर हे फक्त 38 दिवसांचं आहे.
दोन्ही संस्थांच्या सर्वेंची तुलना केली तर फक्त सव्वा महिन्यातच महायुतीच्या 19 जागा वाढत असल्याचं सांगण्यात येतंय. तर महाविकास आघाडीच्या 19 जागा कमी होणार असल्याचं भाकीत वर्तवलं गेलंय. त्यामुळे महाराष्ट्रात नेमक कोण सरस होणार याचीच चर्चा आहे.