Monsoon Alert : मुंबईकरांनो सावधान, समुद्रकिनारी जाऊ नका; रेड अॅलर्टच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सूचना
मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवसांमध्येही वारंवार विनंती, आवाहने करुनही मुंबईकर आणि इतर पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यास जातात. तसेच, बीचवर पोहण्यास जातात आणि दुर्घटना घडतात.
मुंबई : कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर व उपनगरांत पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. हवामान खात्याने त्याबाबत रेड अॅलर्ट जारी केला असून सर्व नागरिकांना सतर्कतेच्या सूचनाही दिल्या आहेत. शहरात मागील आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या काळात समुद्रकिनारी बुडण्याच्या घटनाही घडत आहेत. त्या अनुषंगाने मुंबईकरांना रेड अॅलर्ट (Red Alert) आणि ऑरेंज अॅलर्ट (Orange Alert)च्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 याच वेळेत समुद्रकिनारी जाण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. इतर वेळी समुद्रकिनारी कुणीही फिरकू नये, अशा स्पष्ट सूचना महापालिका प्रशासना (Municipal Administration)कडून देण्यात आल्या आहेत. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनारी अनेक जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. सर्वच चौपाट्यांवर विशेष खबरदारी घेतली जात आहे.
Mumbai: In the wake of heavy rainfall & keeping in mind the drowning incidents, all the beaches in Mumbai shall be opened to the general public from 6 am to 10 am only: Brihanmumbai Municipal Corporation
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) July 7, 2022
यंदा मान्सूनमध्ये आतापर्यंत 10 मृत्यूची नोंद
यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवसांमध्येही वारंवार विनंती, आवाहने करुनही मुंबईकर आणि इतर पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यास जातात. तसेच, बीचवर पोहण्यास जातात आणि दुर्घटना घडतात. त्यामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना कोणीही समुद्रकिनारी, बीचेसवर फिरण्यास किंवा पोहण्यास जायला प्रशासनाकडून प्रतिबंध करण्यात आला आहे.
राज्यात पुढचे 4,5 दिवस मुसळधार-अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही भागात पुढील दोन-तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.