मुंबईकरांनो, तुम्ही फास्ट टॅग लावलंय ना? 26 जानेवारी डेडलाईन

मुंबईत 26 जानेवारीपासून चार चाकी वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य असणार आहे.

मुंबईकरांनो, तुम्ही फास्ट टॅग लावलंय ना? 26 जानेवारी डेडलाईन
कार विकायची असेल तर फास्टॅगचे काय होईल? जाणून घ्या काय करावे ते
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 12:01 PM

मुंबई : मुंबईत 26 जानेवारीपासून चार चाकी वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य असणार आहे. मुंबईतील 5 पैकी 4 टोलनाक्यांवर सेंसर लावण्याचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत  विना फास्ट टॅग गाडीला टोला नाका क्रॉस करता येणार नाही. (In mumbai FASTag is Mandatory)

चारचाकी वाहनांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नोव्हेंबर महिन्यात एक मोठा निर्णय घेतला. 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आला आहे. संपूर्ण देशातील टोल नाक्यांवर डिजिटल पेमेंट सिस्टिमला चालना देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. आता मुंबईतही 26 जानेवारीपासून विना फास्ट टॅग गाडी टोल नाका पार करु शकणार नाही.

मुंबईतील दहिसर टोलनाका सोडता अन्य चार ठिकाणच्या टोल नाक्यावरील सेंसर तसंच इतर तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. येत्या 26 जानेवारीपासून अनिवार्य फास्ट टॅगचा नियम लागू करण्यासंबंधी सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

एमएसआरडीसीचे जॉइंट एमडी विजय वाघमारे यांनी सांगितलं की, “दहिसर टोल नाका वगळता अन्य चार टोल नाक्यावरील काम पूर्ण झालं आहे. 26 जानेवारीपासून हा नियम लागू करण्याचा प्रस्ताव आम्ही सरकारला पाठविला आहे”

दहिसरमध्ये अडचण

दहिसर टोलनाक्याजवळूनच मेट्रो जात असल्याकारणाने टोल नाक्यासंबंधी बदल होणे अपेक्षित आहे. विजय वाघमारे म्हणाले, “फास्ट टॅग सेंसर लावण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. त्यामुळे दहिसर मेट्रो प्रस्तावित मार्ग असल्याने त्याठिकाणी सेंसर लावले नाहीत”

विना फास्ट टॅग काहीच दिवसांसाठी

मुंबई पुणे एक्स्पप्रेस हायवे आणि वांद्रे वरळी सी लिंक रोडवर फास्ट टॅग लावले गेले आहेत. सध्या विना फास्ट टॅगसाठी काही लाईन चालू आहेत मात्र त्या काही दिवसांसाठीच चालू असतील.

टोल वसुलीचा कुठे कुणाला अधिकार

मुंबईतील मुलुंड, ऐरोली, दहिसर, वाशी एलबीएस मार्ग, वांद्रे वरळी सी लिंक तसंच मुंबई पुणे एक्सप्रेसवेसह अन्य रोडवरील टोल वलूली करण्याचा अधिकार एमएसआरडीसीजवळ आहे. नॅशनल हायवेवरील टोल वसुली करण्याचा अधिकार एनएचएआयकडे आहे.

FASTag बाबत शंका असेल, तर हे नक्की वाचा…

प्रश्न : फास्टॅग काय आहे आणि कसं काम करतं?

उत्तर : डिजीटल पेमेंटला वाव देण्यासाठी फास्‍टॅगला राष्ट्रीय महामार्गांच्या टोल नाक्यांवर लागू करण्यात आलं आहे. फास्‍टॅगला गाडीच्या विंडस्क्रीनवर लावावं लागतं. याला लावल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावरुन जाताना तिथे लावण्यात आलेले कॅमरे या फास्टॅगला स्कॅन करतात. त्यानंतर टोलची रक्कम तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाते. ही प्रक्रिया अगदी काही सेकंदांमध्ये पूर्ण होते. गाडीच्या विंडस्क्रीनवर लागलेला फास्टॅग मोबाईल फोनसारखा रिचार्ज होतो. फास्टॅगला My FASTag अॅप किंवा नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, यूपीआय आणि इतर कुठल्याही पद्धतीने रिचार्ज केलं जाऊ शकतं.

प्रश्न : FASTag रिचार्ज / टॉप-अपसाठी कुठली मर्यादा आहे का?

उत्तर : ग्राहक 100 रुपयांच्या मूल्यवर्गात फास्टॅग खात्याला रिचार्ज करु शकतात. तर रिचार्जची सर्वाधिक रक्कम ही वाहन आणि खातं लिंकच्या प्रकाराच्या आधारावर निश्चित केली जाते. रिचार्जची जास्तीतजास्त रक्कम सर्व बँकांच्या वेबसाईट्सवर देण्यात आली आहे.

प्रश्न : फास्‍टॅग कुणाला मिळणार?

उत्तर : फास्‍टॅग ती प्रत्येक व्यक्ती घेऊ शकते जिच्याकडे चारचाकी वाहन किंवा कुठलं मोठं वाहन आहे. यासाठी वाहनाचं रजिस्‍ट्रेशन सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो, अॅड्रेस प्रूफ व्यतिरिक्त केवायसी कागदपत्रांची एक प्रत आवश्यक असेल.

प्रश्न : फास्‍टॅगचा महिन्याचा पास कसा बनवता येईल?

उत्तर : महिन्याच्या पासची सुविधा प्रत्येक टोल नाक्यावर उपलब्ध आहे. तुम्ही महिन्याच्या पाससाठी आवश्यक माहिती मिळवण्यासाठी टोल फ्री ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधू शकता. तुम्ही एनएचएआयच्या वेबसाईटवरही महिन्याभराच्या पासची सुविधा मिळवू शकता.

प्रश्न : माझ्याजवळ दोन वाहनं आहेत. मग मी एक FASTag चा वापर दोन्ही वाहनांसाठी करु शकतो का?

उत्तर : ग्राहक एका वाहनसाठी फक्त एक टॅगचा वापर करु शकतात. एकदा हे FASTag गाडीच्या विंडस्‍क्रीनवर चिकटवलं, त्यानंतर त्याला काढता येणार नाही. जर तुम्ही जबरदस्ती हे टॅग काढण्याचा प्रयत्न कराल तर तो नष्ट होऊन जाईल आणि टोल नाक्यावर तुमच्या काहीही कामात येणार नाही.

प्रश्न : जर माझं FASTag टोल नाक्यावर काम करत नसेल तर काय करायचं?

उत्तर : जर तुमचं FASTag टोल नाक्यावर स्विकारलं जात नसेल तर तुम्ही टोल-फ्री क्रमांक 1033 वर संपर्क साधू शकता.

प्रश्न : माझं FASTag कुठल्या टोल नाक्यावर काम करेल? याची माहिती कुठे मिळेल?

उत्तर : देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील 536 पेक्षा जास्त टोल नाक्यांवर हे FASTag स्विकारलं जाईल. या टोल नाक्यावर फास्‍टॅग लेन बनवण्यात आले आहे. हे लेन 500 मीटर दूरुनच नजरेस पडते. FASTag च्या माध्यमातून कशाप्रकारे टोल भरावा हे तुम्ही टोल बूथवरील कर्मचाऱ्यालाही विचारु शकता.

अधिक माहितीसाठी https://www.npci.org.in/sites/all/themes/npcl/images/PDF/Plaza%20Master-31-08-2019%20-%20PDF.pdf  या लिंकवर क्‍लिक करा. या संकेतस्थळी तुम्हाला सर्व टोल नाक्यांची माहिती मिळेल.

प्रश्न : FASTag बाबत कुठला टोल कर्मचारी चुकीची वागणूक करत असेल तर काय करायचं?

उत्तर : अशा परिस्थितीत टोल नाक्यावरील संबंधित प्रोजेक्‍ट डायरेक्‍टरजवळ आपली तक्रार नोंदवावी. शिवाय, या घटनेची तक्रार etcnodal@ihmcl.com या संकेतस्थळावरही केली जाऊ शकते. तसेच, तुम्ही टोल फ्री क्रमांक 1033 वर संपर्कही साधू शकता.

(In mumbai FASTag is Mandatory)

संबंधित बातम्या

FASTag बाबत शंका असेल, तर हे नक्की वाचा…

1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांना FASTag बंधनकारक, मोदी सरकारचा मोठा निर्णय

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.